सौ.अक्षरा कदम दुस-यांदा तळा पंचायत समितीच्या सभापती

सौ.अक्षरा कदम दुस-यांदा तळा पंचायत समितीच्या सभापती


महाराष्ट्र २४ आवाज



तळा (श्रीकांत नांदगावकर) रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील तळा पंचायत समिती सभापती पदी दुस-यांदा अक्षरा सचिन कदम यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान सभापती देवकी लासे या गेली नऊ महिने पदावर होत्या परंतु त्यांनी अचानक राजिनामा दिल्या कारणाने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीसाठी चार सदस्य उपस्थित होते .परंतु सभापतीपद महिलेसाठी राखीव असल्याने एकमेव महिला असलेल्या अक्षरा कदम यांचे अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे त्यांची दिनांक 28 ऑक्टोबर 2020 रोजी तळा पंचायत समितीच्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृह येथे निवडणूक निर्णय अधिकारी अण्णपा कन्नशेट्टी यांनी अक्षरा कदम यांना सभापती म्हणून जाहीर केले व नवनिर्वाचित सभापती अक्षरा कदम यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, माजी सभापती देवकी लासे, उपसभापती गणेश वाघमारे, रायगड जिल्हा परिषद सदस्य बबन चाचले, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष अॅड. उत्तम जाधव, तळा नगरपंचायतचे नगरसेवक चंद्रकांत रोडे, माजी सभापती नाना भौड, राष्टवादी काँग्रेसच्या तळा तालुका अध्यक्षा जानव्ही शिंदे, महाराष्ट्र युवक सचिव किशोर शिंदे, रायगड जिल्हा युवक सचिव अनंत खराडे, तळा तालुका युवक अध्यक्ष नागेश लोखंडे, प्रवीण आंबार्ले, निलेश कदम, कांतीलाल कसबळे , सचिन जाधव आणि सर्व तळा तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच ग्रामसेवक पंचायत समिती कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image