उत्तरप्रदेशातील हाथरथ जिल्यातील मनीषा वाल्मिकी सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी द्यावी
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन
महाराष्ट्र २४ आवाड
उपसंपादक- संजीव भांबोरे
भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने दिनांक 7/10/ 2020 रोजी जिल्हाधिकारी भंडारा मार्फत महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्यातील बुलगडी गावातील मनीषा वाल्मिकी या मुलीवर शेतात काम करीत असतांना त्याच गावातील चार नराधमांनी 14 सप्टेंबरला अत्याचार करून सामूहिक बलात्कार केले. तिची जीभ कापली व मणक्याचे हाड मोडण्यात आले. त्या मुलीचा दिल्ली येथील सफदरगंज रुग्णालयात 29 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्या मुलीच्या मृत्यूची बातमी तिच्या नातेवाईकांना न देता मुलीचे प्रेत रात्रीच जाळण्यात आले व पुरावा नष्ट करण्यात आला. ही माणूसकीला काळिमा फासणारी घटना असून ज्या नराधमांनी त्या मुलीवर बलात्कार केला त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व ज्या अधिकाऱ्यांनी प्रेत रातोरात जाळले त्यांच्यावर 376 , 302, अनुसूचित जाती अंतर्गत पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्क करण्यात यावे.
निवेदन देताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, विदर्भ सरचिटणीस प्रा. शेखर बोरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने, जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण भोंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते