प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षपदी दैनिक लोकगाथा या वर्तमानपत्राच्या वरिष्ठ पत्रकार ज्योती चिंदरकर यांची निवड
अभिनंदन! अभिनंदन !! अभिनंदन!!!
महाराष्ट्र २४ आवाज
प्रतिनिधी- किरण पडवळ
ठाणे : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षपदी दैनिक लोकगाथा या वर्तमानपत्राच्या वरिष्ठ पत्रकार ज्योती चिंदरकर यांची निवड करण्यात आली आहे.
ज्योती चिंदरकर गेल्या 22 वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून विविध पुरस्कारांने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
ज्योती चिंदरकर संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेच्या महिला राज्यध्यक्षा डाॅ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक सविता कुलकर्णी, रायगड जिल्हाध्यक्षा दिपीका चिपळूणकर, यांच्या सुचनेनुसार संस्थापक अध्यक्ष व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे .
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
डी.टी.आंबेगावे
संस्थापक अध्यक्ष
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य
मो.9270559092 / 7499177411