थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा

 


थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद


 बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक 


न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा


महाराष्ट्र २४ आवाज



जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे


अंजनगाव शहरातील मानव विकास सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष व ग्रामवैभवचे सह. संपादक डॉ. नंदकिशोर पाटील व त्यांचा भाऊ विनोद पाटील यांचेवर अंजनगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून त्यांनी बँकॉक थायलंड सफारीच्या नावा खाली कित्तेक लोकांची फसवणूक केल्याचे तक्कार अर्जात नमूद आहे. ज्यावरून पोलीस स्टेशनं अंजनगाव येथे अप. क्र. ५१२ अन्वये भादंवि चे कलम ४०६, ४६८, ४२०, ३४ नुसार गुन्ह्याची नोंद झाली असून फिर्यादी राजूसिंग धनसिंग जाधव यांचे तक्कार अर्जा प्रमाणे आरोपी अटकेत असून पुढील तपास उप. पोलीस निरीक्षक विशाल पोळकर करीत आहेत. 



 हकीगत अशाप्रकारे आहे की २०१९ मध्ये मानव सेवा विकास फाउंडेशन मार्फत बँकॉक थायलंड येथे सफारी योजना सुरु करण्यात आली होती. ज्यामध्ये येणेजाणे साठी प्रति व्यक्ती किमान ४०,००० रुपये डॉ. नंदकिशोर पाटील यांनी दीलेल्या बँक अकॉउंट मध्ये जमा करण्यास सांगितले होते. ज्यावरून फिर्यादी यांनी ८०,००० व त्यांचेच परिचित सौ. रजनी काळमेघ रा. वरुड व त्यांचे नातेवाईक यांनी १,६०,००० असे एकंदरीत दोन लक्ष चाळीस हजार रुपयांचा भरणा करण्यात आला. त्यानंतर डॉ. नंदकिशोर यांनी विमानाचे तिकीट पाठविण्यात आल्या नियोजित सफारीच्या तारखेवर आम्ही मुंबई येथे पोहचलो त्यानंतर डॉ. नंदकिशोर यांनी भ्रमण ध्वनी मार्फत सांगितली की हा प्रवास काही अपिरिहार्य कारणावरून रद्द करण्यात आला आहे. पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल अन्यथा आपण भरणा केलेली रक्कम आठ दिवसात परत केल्या जाईल असे सांगितल्या गेले. बरेच दिवस निघून गेल्या नंतर कोणताही संपर्क न झाल्याने आम्ही त्या प्रवासी योजनेची माहिती मिळविली असता आम्हास लक्षात आले की बँकॉक प्रवासा करीता प्राप्त झालेल्या तिकिटाचे पूर्णतः खोट्या असून बनावटी असल्याचे समझले. ज्यावरून आम्ही डॉ. नंदकिशोर याच्यासोबत संपर्क केला असता सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मी नियोजित केलेल्या सहली मध्ये माझी एका कंपनीने फसवणूक केली आहे. ज्यामुळे मी त्या कंपनीच्या विरोधात प्रकरण दाखल केले असून त्या प्रकरणाचा न्याय मिळे पावतो मी कोणताही व्यवहार करू शकत नाही. तुम्हास न्यायालयाचा अवमान करावयाचा असल्यास बिनधास्त करा. अशा प्रकारची भाषा वापरून फोन बंद करतो. ज्यामुळे फसगत झालेल्या लोकांनी पोलीस स्टेशनं अंजनगाव येथे फसणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


मानव विकास सेवा फाउंडेशनचे नावाला काळिमा... 


महाराष्ट्र राज्यातील कित्तेक लोकांची नानाविध प्रलोभन दाखवून फसवणूक करणारा व दिशाभूल करणाऱ्यास कायद्याने अटकाव व्हावा. संपूर्ण राज्यातून अनेक लोकांना फसवून करण्यात आली असून लाखो रुपयांचा गंडा ह्या भावांनी लोकांना लावला आहे. ह्यानंतर ह्या भावांवर अनेक गुन्हे दाखल होणार असल्याची शक्यता आहे. अशी चर्चा फिर्याद देण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये होती.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image