तपसे चिंचोली येथील बचत गटाच्या महिलानी अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर काढला मोर्चा

लातूर जिल्ह्यातील विशेष बातमी
::;;;;;::::::::::::::::::::::::::::::::::::
तपसे चिंचोली  येथील बचत गटाच्या महिलानी अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर काढला मोर्चा
:::::::::::::::::;:;;:::::::::::
तपसे चिंचोली व लामजना येथील दारू विक्रेत्याला दिला चोप
:--–-------------------------------
 गटाच्या महिलांची किल्लारी पोलिसांकडे तात्काळ दारू बंदीची  मागणी
दिनांक :-१फेब्रुवारी २०२० 
 प्रतिनिधी :--
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली आणि लामजना येथे अवैध दारूविक्रीमोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या प्रकरणी गावातील बचत गटाच्या महिला आणि गावातील लोक यांनी एकत्रित येऊन अवैध दारूविक्री करणाऱ्या रुक्मिणी विठ्ठल येरनुळे, आणि लामजना येथील श्रीमंत पवार  या विक्रेत्याला चोप दिला .तपसे चिंचोली येथील दारूविक्री  करणारा  कृष्णा बाबू नेटके हा सापडू शकला नाही गावकऱ्यांनी  दारूच्या  बाटल्या जाग्यावर फोडल्या  तसेच देशी दारूच्या ५१ आणि इंग्लिश कंपनीच्या ११ बॉटल जप्त करून  पोलिसांच्या ताब्यात दिल्या.यावेळी किल्लारी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे , उमाकांत चपटे यांच्यासह किल्लारी पोलीस स्टेशन ताफा घटनास्थळी दाखल झाले होते.
 किल्लारी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व दारू दुकाने येत्या तीन दिवसांत बंद करण्याची आश्वासन पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी महिला व गावकर्यांना दिली आहे.


औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय चोरुन चालु आहे.


जिल्ह्यात आगोदरच  दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी शेतमजूर हवालदिल झाले असून   अशातच  अवैध धंद्याला पेव फुटले असून अनेकांची घरे उध्वस्त होतानाचे चित्र पहावयास मिळत आहे . तरुण पिढी  दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन  झाले मुळे  अनेक आजाराला सामोरे जावे लागत असल्याने याकडे  स्वतः  पोलीसानी लक्ष द्यावे अवैध दारु धंद्याला आळा घालावा.अशी मागणी महिला वर्गातून व गावकार्यकडून केली जात आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image