डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे
भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- लक्ष्मण कांबळे
अंबाजोगाई बर्दापुर या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ दि 29/10/20 या रोजी बर्दापुर पोलीस स्टेशन येथे भिम आर्मी चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक भाऊ कांबळे यांच्या उपस्थिती मध्ये पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तात्काळ बसविण्यात यावा व त्या ठिकाणी cctv कॅमेरा बसविण्यात यावा आरोपीनां तात्काळ अटक करून कड़क शासन करण्यात यावे व बर्दापुर चे सरपंच यांना सह आरोपी करा आदी मागण्यांचे निवेदन आज देण्यात आले यावेळी सर्व भिम आर्मी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहीजे. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मा.महाराष्ट्र प्रदेश प्रमुख भीम आर्मी भारत एकता मिशनचे अशोक कांबळे यांनी मागणी केली आहे.