महाराजस्व अभियान व शेतकरी सन्मान कार्यक्रम संपन्न
भंडारा जिल्यातील भंडारा तहसील अंतर्गत कृषी चिकित्सालय पहेला येथे महास्वराज्य अभियान व शेतकरी सन्मान कार्यक्रम दिनांक 15फरवरी 2020ला संपन्न झाला. वरील कार्यक्रम भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्रभाऊ भोंडेकर यांच्या अध्येक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी शेतकरी समन्व्यक समितीचे अध्यक्ष भंडारा येथील तहसीलदार अक्षय पोयाम उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हूणन ज़िल्हा परिषद सद्सव सुभाष आजबले, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, महिला व बाल कल्याण अधिकारी लिपसे, प्रगतीशील शेतकरी भदुजी कायते, प्रगतीशील महिला प्रतिनिधी यामिनीताई बांडेबुचे, उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील नागरिकांना जात प्रमाणपत्र, नानक्रिमिलियर प्रमाणपत्र, श्रावणबाळ व संजय गांधी मंजुरी पत्र, प्राधान्य राशन कार्ड चे वाटप, राष्ट्रीय आर्थिक मदत निधी प्रमाणपत्र, तालुका कृषी अधिकारी मार्फत अस्विन शेंडे व महादेव नंदेश्वर यांना टॅक्टर चाबी चे हस्तांतरण करण्यात आले. कार्यक्रम सफल करण्याकरिता अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे, तालुक्यातील तलाठी, ग्रामविकास अधिकारी प्रदिप लांजेवार, अंगणवाडी कर्मचारी, सामाजिक वनीकरण चे कर्मचारी, अन्न विभागाचे कर्मचारी, संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार सुनीता गावंडे, चेतना कोरेटी, कुलदीप गंधे, गोकुळ केदार, अमित बावनकर, दयानंद नखाते, केवलराम बांडेबुचे,अमोल फेंडर, इस्तारी वंजारी, राशन दुकानदार, अंगणवाडी सेविका, गुरुदेव गजबे, अरुण खराबे, चंद्रशेखर खराबे, यांनी सहकार्य केले. यावेळी असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मंडळ अधिकारी निंबार्ते यांनी केले. संचालन तलाठी कविता झळके यांनी तर आभार नथू शेंडे तलाठी यांनी मानले.