स्वराज्य प्रतिष्ठान रायगडने राबविली गडकिल्ले मोहीम

स्वराज्य प्रतिष्ठान-रायगड ह्या संघटनेने दि.16 फेब्रुवारी 2020 रोजी, गडकिल्ले मोहीम प्रतापगड राबवली होती ह्या मोहिमे अंतर्गत प्रबोधन कार्यक्रमाच्या स्वरूपात छत्रपती शिवरायांचे प्रामाणिक, निष्ठावंत मावळे व छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य या विषयावर ही व्याख्यानमाला आयोजित केली होती..ही मोहिम स्वराज्य प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष मा.श्री.भास्करभाई नारायण कारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती..या मोहिमेत अंदाजे पाचशे ते आठशे तरुणांनी ( युवक-युवती ) सहभाग घेतला होता, या मोहिमेत प्रतापगड किल्ल्याचे दर्शन तर गडाच्या प्रत्येक भागाची पाहणी करण्यात आली, गडावर तरुणांचा शिवगर्जनेचा एल्गार तर एकीकडे पोवाडा म्हणत तरुण आनंद घेत होता, त्याचबरोबर व्याख्यानमालेच्या रूपाने व्यक्त्यांकडून अनेक विचारांची सांगड झाली, तसेच प्रमुख व्याख्यात्या मा.प्रज्ञाताई घडगांवकर यांचा महिला संघटन यांच्या वतीने पुस्तक व शाल देवून सामूहिक सत्कार करण्यात आले..वक्त्यांकडून जे मार्गदर्शन लाभलं ते याठिकाणी मा.सुरेश चोरगे सर सांगतात स्वराज्य प्रतिष्ठान रायगड या संघटनेमध्ये अठरा पगड बारा बलुतेदार सर्व समूहातील मावळा निष्ठेने काम करत आहेत. तर पुढे मा.प्रज्ञाताई घडगांवकर सांगतात शिवाजी महाराजांचे चरित्र केवळ वाचल नाही पाहिजे तर आचरणात आणल पाहिजे.शिवरायांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे मैदानात आहात तो पर्यंत हार मानू नका, तर मा.विक्कीदादा कदम म्हणतात मला प्रत्येक क्षेत्रातला शिवाजी महाराज व्हायचं आहे. शिवराय म्हणजे टाईम, मॅनेजमेंट, सक्सेस.., त्याचप्रमाणे संघटनेचे प्रवक्ते मा.महेशभाई आंबवले म्हणतात इमानदारी ही जातीवरून ठरवता येत नाही तर मावळ्यांच्या प्रमाणिकतेवर ठरवता येते. जिथे शिवरायांनी घाम गाळला तिथं मावळ्यांनी आपलं रक्त सोडलं ही स्वराज्याची निष्ठा..यानंतर संघटनेचे अध्यक्ष मा.भास्करभाई यांनी शेवटचे आपले मनोगत व्यक्त केले यांमध्ये त्यांनी मोहिमेला उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार मांडून थोडक्यात संघटनेचा सहा वर्षांचा प्रवास सांगून 2021ला होणाऱ्या जनगणेबद्दल बोलतांना त्यांनी आवाहन केलं की येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही पाटी लावा मोहीम करण्यात येणार आहे तर सर्वांनी सामील व्हा.!!शेवटी मा.गणेश काप यांनी कार्यक्रमाची सांगता केली आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.वैभव घाडगे यांनी केले अश्यारीतीने ही गडकिल्ले मोहीम मावळ्यांच्या उपस्थिती आनंदाच्या उत्साहात शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे संपन्न झाली..


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image