श्रीवर्धन जसवली ग्रामीण रूग्णालयात वरीष्ठ डाॅ.व कर्मचा-यांचा सावळा गोंधळ

 


श्रीवर्धन जसवली ग्रामीण रुग्णालयात वरिष्ठ डॉ व  कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ


रामचंद्र घोड्मोडे 


श्रीवर्धन तालुक्यातील समाज व शिवसेना कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालय जसवली आरोग्य केंद्राला दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास पाहणी केली असता, यावेळी १४ कर्मचारी नेहमी रुग्णालयात ड्युटीवर येत नसल्याचे सावळा गोंधळ उघड झाले असून या मुळे इथल्या महिला प्रसूती गृह, बेबी  ऑक्सिजन मशीन, एक्सरे मशीन व  पंधरा खाट धूळ खात असल्याचं दिसून आले आहे.एक्सरे मशीन २०१५ पासून बंद असून गंजली आहे.
सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना प्राथमिक उपच्यार  मिळावेत यासाठी जिल्हापरिषदेकडून आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. मात्र शासनाच्या या योजनेला छेद देत जसवली ग्रामीण रुग्णालयातील चौदा कर्मचारी कायम ड्युटीवर उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 
जसवली ग्रामीण रुग्णालयमध्ये   डॉ. एम.डी. ढवळे वैद्यकीय अधीक्षक असून ते कधीही येत नाही.डॉ. खलिजा उलडे वैद्यकीय अधिकारी ह्या सुद्धा येत नाही. डॉ. ढवळे यांचा स्वतःचा दवाखाना हॉस्पिटल असल्या मुळे ते सरकारी दवाखान्यांमध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालत नाही असे समाज व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. शासनाने यावर गांभीर्याने लक्ष देऊन या सर्व कर्मचाऱ्यांना व डॉकटर ना जसवली ग्रामीण रुग्णालयात येथे पाठवले तर गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होईल असे श्रीवर्धन समाज कार्यकर्ते व शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी आहे. यावेळी समाज व शिवसेना करकर्ते सुरेश करणं पाटील, अरुण शिगवण, आदेश पाटील,मंगेश हेदुलकर, सचिन गुरव, दिलीप सलदुरकर , संदीप पेंढारी, सचिन गायकवाड, मारुती विचारे, गजानन कदम, उपस्थित होते.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image