जीवन विकास माध्यमिक व स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयातील विद्यार्थ्यांंना निरोप
--------------------
लातूर --लातूर येथील जीवन विकास माध्यमिक व स्वातंत्र्यवीर सावरकर शाळेत 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनवणे सर होते.प्रमुख अतिथी म्हणून औसा तालुक्याचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोषाध्यक्ष श्रीकांत चलवाड उपस्थित होते. तसेच आकांक्षा वाघमोडे यांचीही उपस्थिती होती. यावेळी उ.मु नम्रता कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.चलवाड यांनी कठीन परिस्थितील न खचता विद्यार्थ्यांनी संघर्ष करावा असे आवाहन केले.यावेळी 9वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलतांना मु.अ सोनवणे सर यांनी संघर्षच यश मिळविण्याची प्रेरणा देतो .त्यामुळे संघर्ष करीतच पुढे जाण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.प्रास्ताविक गजगे सर, सूत्रसंचलन बनसोडे सर तर आभार पांढरे सर यांनी मानले.याप्रसंगी कोल्हे सर ,पिंटू ढोले,रोजू शेख,पांचाळ,चाहे मँडम,पाटील मँडम,गिराम सर,तेलंग सर,लोहकरे सर ,बंडगर सर,पेझेवाड सर,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते..
जीवन विकास माध्यमिक व स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना निरोप