धामणगाव येथे धर्मपाल भाऊ देवशेट्टे यांच्या हस्ते खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
*धामणगाव येथे धर्मपाल भाऊ देवशेट्टे यांच्या हस्ते खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन..*
धामणगाव ता.जळकोट येथे शिवजयंती निमित्त ठेवण्यात आलेल्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक धर्मपाल भाऊ देवशेट्टे यांच्या हस्ते पार पाडले.तत्पुर्वी राष्ट्रगीताने या स्पर्धेच्या उद्घाटनाची सुरुवात करण्यात आली.येणाऱ्या काळात जळकोट तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आपण करणार असल्याचे धर्मपाल भाऊ देवशेट्टे यांनी सांगितले.शेतकरी,गोरगरीब जनतेची बाजु मांडण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही.पण आम्ही शेतकरी आणि गोरगरीब जनतेसाठीच काम करत राहणार असल्याचे ते म्हणाले.यास्पर्धेचे प्रथम पारितोषिक भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल कांबळे यांच्याकडून ११,१११ तर द्वितीय पारितोषिक लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांच्याकडून ७००१ रुपये असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी धामणगावचे पोलीस पाटील पांडुरंग पाटील,विश्वनाथ बेंबडे गुरुजी,सरपंच अरुणा सोनकांबळे,डॉ.आर.आर. मोटे अप्पा,बालाजी तोगरे,ओमकार टाले,कार्यकर्ते,नागरिक व अनेक खेळाडु तसेच संयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
..