सिंधपुरी (रुयाळ ) महासमाधीभूमी च्या विकास कामाकरिता प्रयत्न करणार - आमदार नरेंद्र भोंडेकर - पय्या मेत्ता संघ सिंधपुरी ( रुयाळ ) तालुका पौनी ज़िल्हा भंडारा च्या वतीने आयोजित महासमाधी भूमी 33 वा धम्मोत्सव, महासमाधी महाविहाराचा 13वर्धापन दिन, पय्या मेत्ता बालसदनाचा 29वा वर्धापन दिन, पय्या मेत्ता वाचनालयाचा 15वा वर्धापन दिन त्याचप्रमाणे भदन्त संघरत्न मानके यांच्या धम्म कार्याला 50 वर्ष झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात लाखो जनसमुदाय समोर बोलताना आमदार नरेंद्र भोंडेकर म्हनाले की मी क्षेत्राचा आमदार असल्यामुळे मला 5 वर्ष या महासमाधी भूमीत यावे लागणार आहे. व पुढील वर्षी या महासमाधी स्थळी येण्यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण झालेले दिसेल, त्याचप्रमाणे राज्यशासनाच्या पर्यटन विभागामार्फत ब श्रेणीचा दर्जा मिळविण्याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे उदघाटन जपान चे भदन्त आसाई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी पय्या मेत्ता संघ भारत चे भदन्त संघरत्न मानके होते. प्रमुख अतिथी म्हणून भदन्त सदानंद महाथेरो , आमदार नरेंद्र भोंडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामूहिक बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना, बालसदनाच्या गुणवंत विध्यार्थीचा सत्कार, 50 वर्ष धम्म कार्याला पूर्ण झाल्याबद्दल भदन्त संघरत्न मानके यांचा 50 हजार रुपये , शाल व श्रीफळ विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार, त्याचप्रमाणे महेंद्र गोसावी व त्याच्या कुटूंबियांच्या वतीने चिवर दान करण्यात आले. कार्यक्रम स्थळी चोख पोलीस बंदोबस्त, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, विविध सेवा भावी संस्थाचे वतीने भोजनदानाची सुविधा करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सुंदर असे संचालन माजी न्यायाधीश महेंद्र गोसामी यांनी केले. यावेळी लाखो बोद्ध उपासिका व उपासक उपस्थित होते.
महासमाधिभूमीच्या विकासकामासाठी प्रयत्न करणार- आ.नरेंद्र भोंडेकर
• मुख्य संपादक- आंबेगावे डी.टी.