महाविकासआघाडी सरकारला पण मराठा आरक्षणासाठी बळी हवा आहे का?
उदगीर प्रतिनिधी- विकास भंडे
सकल मराठा समाज पुरस्कृत SEBC-ESBC उमेदवारांचे ,मराठा आरक्षण महाराष्ट्र आधिनीयम क्र.62/2018 मधील कलम 18 नुसार मराठा विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळे पर्यंत दि 28 जाने. 2020 पासुन स्थळ -आझाद मैदान , मुंबई येथे चालु आहे. आज 28 वा चालू असून. त्याची दखल आजुन सत्ताधारी सरकार मधील कोणत्याही नेते मंडळीनी घेतली नसल्याने न्याय मिळाला नाही, म्हणून उदगीर जि. लातूर येथील स्वाभिमान संघटनेकडून मराठा विद्यार्थ्यांनच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व संबंधित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठा विद्यार्थ्यांनच्या न्याय हक्कासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील विविध विभागातील निवड प्रक्रिया पुर्ण झालेले विद्यार्थी सहभागी होते. येणाऱ्या काही दिवसात शासनाने मराठा विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या नाहीत तर सकल मराठा समाज व स्वाभिमान संघटना, स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नितेशजी नारायणराव राणे साहेब यांच्या नेतृत्वात राज्यभर आंदोलन उभे करेल. त्यामुळे होणाऱ्या जीवित व वित्त हनिस सरकार जबाबदार राहील. म्हणून तातडीने कारवाई सुरू करून मराठा विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्यावेत असे स्वाभिमान संघटने कडून प्रतिपादन करण्यात आले. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी 50 बांधवाच्या बलिदानानंतर, महा विकास आघाडी सरकारने मराठा आत्महत्या सत्र सुरू होण्याची परिस्थिती निर्माण करू नये. महाराष्ट्र प्रशासनाच्या विविध विभागातील निवड प्रक्रिया झालेले विद्यार्थी हजारोच्या संख्येने सकल मराठा समाजासह मुंबई येथे आंदोलनात येऊन बसले आहेत. हे आंदोलन नियुक्त्या मिळेपर्यंत चालत राहील. मराठा उमेदवारांच्या प्रलंबित नियुक्त्या गेल्या सात महिन्यांपासून दिल्या गेलेल्या नसल्याने उमेदवारांचे मानसिक आर्थिक व सामाजिक नुकसान झालेले आहे. शासन अजून कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करत नाही यामुळे मराठा मुलांमध्ये टोकाची नाराजी व नैराश्य आले आहे. महाराष्ट्रातील 50 ते 55 विभागाच्या पदभरती मधील मराठा उमेदवारांच्या भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण झालेले आहेत व केवळ नियुक्त्या मिळाल्या नाहीत त्यामुळे ते सरकारला आत्मदहन इशारा देत आहेत. परत एकदा सरकारला बदलण्याची गरज असल्यास आम्ही मागे हटणार नाही असे म्हणत त्यांनी निवेदन दिले. यावेळेस स्वाभिमान संघटनेचे सर्व पदाधिकारी अतुल काकडे,विकास भंडे, सलीम शेख, सावण तोरणेकर,
निवृत्ती तिरकमटे,सतीश पाटील मानकिकर, माणिक चव्हाण, संभाजी ब्रिगेड चे ता. अध्यक्ष राजकुमार माने, गणेश मुंडकर ..इ.
महाराष्ट्रातील विविध विभागातील निवड प्रक्रिया पुर्ण झालेले पण नियुक्तीपत्र न भेटलेले तालुक्यातील मराठा विद्यार्थ्यांची नावे
भागवत शेषराव ढगे (महावितर), राजकुमार रामचंद्र दोडके (महावितरण),
ध्वज तातेराव मुळे( महावितरण), मनोहर रामराव बिरादार (महावितरण),
परमेश्वर प्रकाश मुंडकर (महावितरण),
दशरथ व्यंकटराव जाधव (महावितरण),
दयानंद दादाराव जाधव (महावितरण),
संतोष गुंडेराव बामणे (महावितरण)..