वडिलांच्या अंत्यविधी दिवशीच मुलाने दिली 10 वी ची परीक्षा


वडिलांच्या अंत्यविधी दिवशीच मुलाने दिली १०वी ची परीक्षा


लातुर :- 
निलंगा ची विषेश बातमी
----------------------------
 वडिलाच्या निधनाचे दुःख असतानाही निलंगा शहरातील  मिलींद नगर  भागातील रितेश कांबळे याने भूमितीचा पेपर  दिला.
निलंगा येथील मिलिंद नगर चे रहिवासी असलेले मनोज  कांबळे यांचे काल दिनांक १३  मार्च रोजी दुपारी आकस्मित निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही मनोज कांबळे यांचा मुलगा रितेश याचा  दिनांक १४ मार्च रोजी भूमिती विषयाचा पेपर होता. व १४ मार्च रोजीच वडीलांचा अंत्यविधी होता.  जर पेपर नाही दिला तर  पुढील शिक्षण घेणे कठीण झाले असते.  म्हणून रितेशने पेपर  देण्याचा मनाशी निर्धार केला व वडिलांचा मृतदेह घरात असताना निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय केंद्रावर त्याने पेपर दिला. व त्यानंतर त्यांने  जड अंतकरणाने वडिलांच्या चितेला  अग्नी दिला.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image