अंजनगाव सुर्जीत शेती शेजारी असणा-या मालकाचे मध्यस्थाचे त्रासाबद्दल केली आत्महत्या

 


अंजनगाव सुर्जीत शेती शेजारी असणाऱ्या शेत मालकाचे मध्यस्ताचे त्रासा पायी केली आत्महत्या
 


उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कडे मृतकाचे  पत्नीची तक्रार....... 
  स्वमालकीचे शेता शेजारी ताबा धारकांनी बोरवेल न करू दिल्याने केली आत्महत्या....


अंजनगाव सुर्जी- गजानन हुरपडे 


  अंजनगाव सुर्जी येथील पानअटाईभागात राहणाऱ्या  संतोष  उत्तम कपले ह्यांचे खोडगांव ऐवजपुर  शेत सर्वे नंबर १६ शिवारात दोन एककर शेत असून गेली चार वर्षा पासून निसर्गाचे अवकृपेने ह्या भागातील विहिरीच्या पाण्याची पातळी  खोल गेल्यामुळे ह्या भागातील शेतकरी पाण्याअभावि संकटात सापडले आहेत. त्यामुळे संसाराचा गाड़ा कसा चालवावा ह्या काळजीने  शेतातील मोठ्या मेहनतीने पेरलेले पिक जगवीन्यासाठी पत्नीचे व आईचे अंगावरील सोने मोडून शेतात नवीन बोरवेल करावे ह्या उद्वेषाने संतोष कपले ह्यांनी बोरवेल करणाऱ्याला सांगितले. बोरवेल मशीन सुद्धा शेतात नेली. मात्र शेजारी असलेले गणपती बोरडा मंदिराचे शेतीचा वादग्रत वाहितदार सुभाष महादेव थोरात, रतन महादेव थोरात  ह्यांनी संतोष कपले ह्याला त्याचे स्वतःचे शेतात बोरवेल करण्यास मनाई केली तसेच मानसिक दबाव टाकला होता.  पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा बोरवेल करण्याचा विचार मृतकाने केला असता पुन्हा तोच वाद निर्माण झाला. पोलिस स्टेशन मधे प्रकरण गेले असता ठाणेदारांनी  दोन्ही पार्ट्याना समजावून बोरवेल करू देण्याची  तोंडी सूचना केली. मात्र  काही एक  उपयोग झाला नाही. अखेर मोठ्या संकटाने पत्नी व आईचे सोने विकुन पैशाची जुळवाजुळव केल्या नंतरही तसेच मोठ्या प्रमाणात  पैशाचा  खर्च करून  सुद्धा देखील अपयशी ठरलेल्या संतोषने . आता संसाराचा गाड़ा कसा चालवावा ह्या विवंचनेतुन संतोष उत्तम कपले ह्यांनी काल दी  १९/३/२०२० ला रात्री ८ वाजताचे दरम्यान राहते घरी विषारी औषद्य घेतले. ज्यावरून त्यास सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय येथे भर्ती केले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे अचलपुर उप जिल्हा रुग्णालय व तेथून रात्रि २ वाजता अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र दुर्दैवाने काल सायंकाळी ९ वाजताचे दरम्यान संतोष ने अखेरचा श्वास घेतला. त्याचे मृत्यु पच्छात आई, वडील, पत्नी , दोन मुले असा आप्त परिवार आहे 
    माझ्या पतीला पान अट्टाई चौका मधे सुभाष थोरात व रतन थोरात ह्यांनी मारहाण केली होती. ह्या बाबत माझे पति व मी अंजनगाव सुर्जी पोलिस स्टेशन ला तक्कार देण्यासाठी गेलो असता आमची तक्कार  थानेदारानी घेतली नाही. तसेच राजकीय वरदहहस्ता मुळे त्या अरोप्याना मोकळीक मिळाली.  मयताची पत्नी नीता संतोष कपले ह्यांनी अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कड़े लेखी तक्कार दिली असल्याचे निता कपले ह्यांनी सांगितले. 
********************************
मृतकाचे पत्नीस विचारणा केली असता माझे पतीने सुभाष थोरात, रतन थोरात, रवण थोरात, महादेव भावे व अंजनगाव सुर्जी चे नागराधेक्ष कमालकांत लाडोळे हेच जबाबदार असून त्याचे विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना गजा आड करण्याचे सांगितले. 
******************************
शेकडो महिला व पुरुष पोस्टे अंजनगाव सुर्जी मध्ये जमा झाले होते. मृतकाचे प्रेत असणारी ऍम्ब्युलन्स पोस्टे येथे आणल्या गेली. अत्यंत संतप्त असणाऱ्या जमावाने गुन्हा दाखल करण्याची भाषा बोलून गुन्हा दाखल करून घेतला. मात्र त्या मृतकाने दिलेल्या टक्करी वरुण आधीच गुन्हा दाखल झाला असता तर आज संतोष जिवंत असता हेच ऐकू येत होते. नागराधेक्ष कमालकांत लाडोळे यांचे घरी जमाव गेला असता मृतक हा मूर्ख होता असे म्हणून आरोपीना वाचविण्याचा प्रयत्न नागराधेक्ष करीत आहेत. पहिलेच मध्यस्ती करून न्याय दिला असता तर मृतक आज जिवंत असता. ज्यामुळे सर्व आरोपीना लगेच ताब्यात घ्यावे अशी मागणी होत आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image