शिवसेनेच्या वतीने बंदोबस्तावरील पोलीसांच्या जेवणाची केली व्यवस्था
प्रतिनिधी- ओमकार टाले
अहमदपूर : कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, कार्यालय, वाहतूक व्यवस्था बंद केली असून संचारबंदी आदेश लागू केल्यामूळे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जेवन तसेच पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे.
सविस्तर माहिती अशी की, कोरोना व्हायरसला रोकण्यासाठी शासनाला संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या संचारबंदी काळामध्ये पोलीस मात्र शहराच्या ठिकठिकाणी ठरवून दिलेल्या ठिकाणावर आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना जेवन तसेच पाणी वेळेवर मिळत नसल्यामूळे पोलीस कर्मचाऱ्यांचे बेहाल होत आहे.याची दखल घेऊन अहमदपूर शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी शहरातील ठरवून दिलेल्या ठिकाणावर ४० पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यामूळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. यावेळी व्यंकट नलवाड, शहरप्रमुख भारत सांगवीकर, बाळू मद्देवाड, अजित सांगवीकर, प्रदिप वट्टमवार यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.