पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला लातूर जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद. शहरात मात्र शुकशुकाट
जळकोट- ओमकार टाले
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यू चे आवाहन केले होते त्यास आज दिनांक 22 माार्च 2020 रविवार रोजी जळकोट करांची भरभरून साथ मिळाली आहे जळकोट व परिसरात अघोषित संचारबंदी सकाळी सात वाजता चालू झाली होती आज एकही जण नागरिक ग्रामस्थ व्यवसायिक आपल्या घराबाहेर दिसत नव्हते आपण नक्कीच कोरोणाला हरवू शकतो जळकोटमध्ये सगळ्या प्रशासकीय यंत्रणा अतिशय कौतुकास्पद काम करीत आहेत पोलीस आणि आरोग्य यंत्रणेत उत्तम समन्वय असून या यंत्रणांचे प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी सामाजिक भावनेतून काम करीत आहेत आपण थोडा संयम आणि प्रशासनाच्या सूचना चे पालन केल्यास नक्कीच आपण यावर विजय मिळवून असे लातुर चे आमदार धिरज देशमुख बोलताना म्हणाले
तरी दिवसभर जे अधिकारी ,डाॅ.सेवा करत होते त्यांचे अभिनंदन म्हणून 5 वाजता लहान मुलांनी घंटी , टाळ्या वाजवून जोरदार कौतुक केले