सद् विचार, सृजनशीलतेला समाजाने भरघोस समर्थन द्यावे- गायकर यांचे आवाहन

सद् विचार, सृजनशीलतेला समाजाने भरघोस समर्थन दयावे - गायकर यांचे आवाहन

कवी शिवाजी पगारे यांच्या  कविता संग्रहाचाा प्रकाशन सोहळा संपन्न 

आहुर्ली-वार्ताहर - समाजात नैतिक मुल्याचां झपाटय़ाने र्हास होत आहे.सुयोग्य संस्कार, मुल्य व सुयोग्य आदर्शाअभावी विकृतीकरण झपाटय़ाने वाढत चालले आहे. हा वेग असाच राहिला तर सार्‍या विश्वाचे भवितव्य अंधकारमय आहे असे नमुद करत ज्ञानेश्वर - तुकाराम आदी संताचा वारसा साहित्यीक पुढे चालवत असुन या सद् विचार, सृजनशीलतेला समाजाने भरघोस समर्थन दयावे असे कळकळीचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यीक नवनाथ अर्जुन पा गायकर यांनी केले. 
    अधरवड ता. इगतपुरी येथील कवी शिवाजी पगारे लिखित "बारा गावचं पाणी पित" या कवितासंग्रहाचे प्रकाशन करतानां प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 
      कविता संग्रह प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी सुप्रसिद्ध रानकवी तुकाराम धांडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यीक प्रा. गंगाधर अहिरे, जेष्ठ विचारवंत क्रॉ राजु देसले, क्रॉ. महादेव खुडे, बुद्धभुषन साळवे, ग्रंथ मित्र बाळासाहेब पलटने, जेष्ठ नेते पंढरीनाथ बर्हे, कवी मिलिंद पंडित,देवा उबाळे, काशिनाथ वेलदोडे,देविदास शिरसाठ आदीसह मान्यवर उपस्थित होते. 
   यावेळी पुढे बोलताना गायकर म्हणाले कि समाजाविषयी कळवळा असणारी ही माणसं आज स्वतच्या प्रपंचाकडे प्रसंगी दुर्लक्ष करत समाजासाठी काम करत आहेत. या अशा लोकांच्या पाठिशी समाजाने खंबीर पणे उभे रहायला हवे. 
    प्रस्तावना करतानां कवी शिवाजी पगारे यावेळी म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम्यक क्रांतीचा वसा घेत चौफेर मी फिरतो आहे. या बारा गावचं पाणी पित लागलेल्या शोधाचा, वैश्विक दु:खाचा पट या कवितेतुन मांडला गेला आहे. दु:खाचं रुप आजही तेच कायम आहे हा आपला पराभव आहे आणि याचं चिंतन, मनन या कवितासंग्रहात आहे असे सांगितले. 
    प्रा. गंगाधर अहिरे यांनी बोलताना कवी शिवाजी पगारे यांच्या कवितेचा धांडोळा घेत काळानुरूप आव्हाने बदलली असली तरी तीव्रता तीच आहे. मात्र लढण्याची धग कमी होत आहे अशी खंत व्यक्त केली. समाज आज आत्ममग्न झाला असल्याबाबत ही खंत व्यक्त केली तर कम्युनिस्ट नेते क्रॉ. राजु देसले यांनी शोषित उपेक्षिताचें प्रश्न आजही तीव्र आहेत व ती दाबण्यासाठी धर्म नावाची अफूची गोळी आज प्रभावी ठरते आहे हा धोका विशद केला. गावागावात नेते उदयाला येत आहे पण कार्यकर्ते मात्र तयार होत नाही ही शोकांतिका त्यांनी व्यक्त केली. 
    जेष्ठ विचारवंत क्रॉ महादेव खुडे यांनी समाजाच्या प्रश्नाचीं गुणोत्तर संख्या वाढत आहे असे सांगतानाच मी, माझं आणि आपलं या पलिकडे कुणी पहायला तयार नाही याबद्दल वेदना व्यक्त केली. तर ग्रंथ मित्र बाळासाहेब पलटने यांनी चळवळ बंद पडत आहे याकडे लक्ष वेधले. 
    यावेळी रानकवी तुकाराम धांडे यांनी नेहमी प्रमाणेच आपल्या महाराष्ट्रभर परिचित कविता सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर उपस्थित कविनीं आपल्या उत्तमोत्तम रचना यावेळी सादर केल्या. 
----------
कै. कैलास पगारे यांच्या स्मृती जपा - गायकर 
    कविवर्य नारायण सुर्वे यांची जातकुळी सांगणारे अधरवड गावचे भूमिपुत्र तथा उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले कवी कै. कैलास पगारे यांच्या स्मृति निमित्ताने दरवर्षी साहित्य क्षेत्रातील मान्यवरास अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक चे वतीने पुरस्कार देण्यात येतो आहे. मात्र गावानेही कै. पगारे यांच्या स्मृति जपायला हव्यात असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनाथ अर्जुन पा गायकर यांनी यावेळी गावकर्‍यांना केले. 
    यावेळी गावाचे वतीने बोलताना जेष्ठ नेते पंढरीनाथ पा बर्हे व गावचे सरपंच ज्ञानेश्वर यांनी समाज मंदिराला कै. कैलास पगारे यांचे नाव देवु असे नमुद केले. 

फोटो कॅप्शन - कवि शिवाजी पगारे यांच्या "बारा गावचं पाणी पित" या कवितासंग्रहाचे प्रकाशन करतानां अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक चे जिल्हा अध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यीक नवनाथ अर्जुन पा गायकर 
    समवेत रानकवी तुकाराम धांडे, कवी शिवाजी पगारे, प्रा. गंगाधर अहिरे, क्रॉ. राजु देसले, क्रॉ. महादेव खुडे, बुद्धभुषन साळवे, बाळासाहेब पलटने आदी.... (छाया नवनाथ गायकर आहुर्ली)

कवी शिवाजी पगारे यांच्या कविता संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न 

Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image