पोलादपूरमध्ये जनता कर्फ्यूला उत्सफूर्त प्रतिसाद

पोलादपुरात महामार्ग व राज्य मार्गावरील हजारो वाहने ठप्प
 


जनता कर्फ्यू ला शंभर टक्के जनता घरातच
  पोलादपूर- निळकंठ साने-


करोना तुला भारतामध्ये थाराना...  अशीच अभूतपूर्व एकजूट तमाम भारतीयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या जनता कर्फ्यू च्या हाकेला प्रतिसाद देत दाखविले हे संपूर्ण जगाने पाहिले आहे.  करोना व्हायरल लढाईसाठी संपूर्ण देश एक दीलानी सज्ज झाला आहे. 
    महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील 31 मार्चपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम व जन जीवन ठप्प करण्याचे आव्हान सर्व पातळ्यांवर केले आहे. त्यातून फक्त जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळण्यात आल्या आहेत.  परंतू बर्‍याचशा  नागरिकांना गर्दी बाबत पथ्य पाळता येत नसल्याचे यापुढे निदर्शनास  आल्यास  शासनाद्वारे कडक उपायोजना केली जाणार.
   जनता कर्फ्यूला पोलादपूर नगरपंचायत नगराध्यक्ष नागेश पवार यांच्या पुढाकाराने संपूर्ण पोलादपूर शहरासह लगतचे महामार्ग व राज्य मार्ग दिवसभर निर्जंतुक  करण्यात आले.  सायंकाळी पाच वाजता सर्व नागरिकांनी  आपापल्या घरातून करोना विरोधी लढाईत योगदान देणाराना टाळ्या, घंटानाद व थाळीनाद करून मानवंदना दिली.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image