प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि तळा पोलिस स्टेशनच्या माध्यमातून गरीब व गरजू मजूरांना देणार अन्नधान्य
तळा तालुक्यातील गरीब व गरजू मजूरांनी संपर्क साधावा.
तळा तालुक्यातील गरीब व गरजू मजूरांना आवाहन करण्यात येते की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि तळा पोलिस स्टेशनच्या माध्यमातून गरीब व गरजू मजूरांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना माणूसकीच्या नात्याने एक हात मदतीचा म्हणून आम्ही अन्नधान्याचे वाटप करण्याचे योजिले आहे. अन्नधान्य तुमच्या घरी आणून दिले जाईल.
तरी तळा तालुक्यातील ज्या गरीब व गरजू मजूरांना अन्नधान्याची आवश्यकता आहे. त्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा आंबेगावे डी.टी. मो.9270559092 / 7499177411 किंवा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे रायगड जिल्हा युवा उपाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर मो.8446916767 यांच्याशी संपर्क साधावा .
टीप: या मोहिमेत सहभागी होऊन कोणाला मदत करायची ईच्छा असेल तर वरील मो .न. वर फोन करा.