कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजी मार्केट धारा 144 चे उल्लंघन नाही काय?

 


कृषि उत्पन्न बाजार समितिचे भाजी मार्केट धारा 144 चे उल्लंघन नाही काय?


अंजनगाव सुर्जी च्या भाजी अडत ला आले यात्रे चे स्वरूप
अड़त दुकाने न लगल्याने शेतकऱ्यांची चांदी.....


अंजनगाव सुर्जी- जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे 
अंजनगाव सुर्जी :- येथील प्रशासनाने कोणतीही व्यवस्था निर्माण न करता कृषि उत्पन्न बाजार समिति मध्ये भाजी अड़त हलविले. या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला उपलब्ध केला आहे. परंतु गर्दी न होऊ देण्याचा न प चा उद्देश्य सफल होतांना दिसत नाही आहे. प्रशासन यात सफसेल निष्क्रिय झाल्याचे दिसते. मात्र 2 दिवस कोणत्याही जुन्या अड़तेनी आपली अड़त लावली नाही. याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होतांना दिसत आहे. परंतु सदर निर्णयामुळे शेतकरी व नवीन अड़ते संतुष्ट असून पारंपरिक अड़त्यांवर गाज कोसळल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मालावार 10% कमीशन घेणारे अड़ते मात्र हेकेखोरी करतांना दिसत आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालावार अड़त ला कमी फायदा होणार असतो. त्यामुळे नगरपालिका च्या या निर्णयाचा भाजीपाला अड़त्यांनी पुरजोर विरोध केला होता, शक्य न झाल्यामुळे त्यांनी शेतकरी व नवीन निर्माण होणाऱ्या अड़त्यांना थांबवन्याच्या दृष्टीने दादागीरी ची भाषा ही वापरली होती. मात्र आज नवीन निर्माण झालेल्या अड़त्यांनी कृषि उत्पन्न बाजार समिति च्या नियोजित जागेवर आपली दुकाने थाटली. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या अड़त्यांनी सदर निर्णयावर बंड पुकारला. नगरपरिषद प्रशासनाने सदर निर्णय घेण्या अगोदर कलम 144 चे उल्लंघन होणार नाही या दृष्टीने उपाय योजना न करता कारणे दाखवा नोटिस मिळताच तत्काळ घेतलेला निर्णय कायद्याचा भंग करीत असल्याचे दिसत आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image