रोजंदारीवर काम करणा-या कामगारांना तात्काळ अन्नधान्य वाटप करा- अक्षय धावारे

1


रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना तात्काळ अन्न धान्य वाटप करा. अक्षय धावारे


 लातूर, - उपसंपादक- लक्ष्मण कांबळे 


कोरोनासारख्या महामारीने संपुर्ण जगामध्ये हाहाकार माजवला आहे यावर उपाय म्हणून भारत सरकार ने लॉक डाऊन करण्याचे आदेश दिले आहेत संपुर्ण भारत या लॉक डाऊन मध्ये सहभागी होत असताना त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असताना दिसत आहे  गेल्या सतरा ते अठरा दिवसांपासून सामान्य नागरिक आपला व्यवसाय काम धंदा बंद करून या महामारिला हद्दपार करण्यासाठी सरकार ने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत पण सरकार यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून कधी थाळी तर कधी दिवा लावण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत पण सामान्य जनता रोजंदारीवर काम करते त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न निर्माण होतो रोजंदारीवर आपली उपजीविका भागवण्यासाठी रांञदिवस काम करणाऱ्या लोकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे परंतू शासनाने कसली ही उपाय योजना न करता लॉकडाऊन कर्फ्यु लावण्याचं काम केले आहे ज्या पध्दतीने लॉक डाऊन केले आहे त्याच पध्दतीने गोर गरीब जनता रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह भागविते अशा लोकांना तात्काळ अन्न धान्य वाटप करण्यात यावे अशी मागणी *भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे* यांनी केली आहे


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image