प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सातारा शाखेच्या वतीने गरीब व गरजू कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप
महाराष्ट्र 24 आवाज
सातारा- प्रतिनिधी- सागर पाटील
कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे संपूर्ण जगासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून गरीब व गरजू कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. हाताला काम नाही, खायला अन्न नाही त्यामुळे जगायचं कसं हा प्रश्न सतावत आहे. गरीब व गरजू कुटुंबाचा विचार करून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील यांच्या पुढाकाराने गरीबांना अन्नधान्याचे वाटप केल्याने गरीब कुटुंबाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ (रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेचे वतीने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे(पाटील आवाडातील गरजू,गरीब कुटुंबाना तांदुळ वाटप करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील,ग्रामपंचायत सदस्य गंगाराम पाटील, गणेश पाटील, मिथुन पाटील आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.