नप कर्मचारी यांची संचारबंदी कायदा उल्लंघन करणा-या दुकानदारांवर धाव

 


 नप कर्मचारी यांची संचारबंदी कायदा उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर धाव


महाराष्ट्र 24 आवाज 


अंजनगाव सुर्जी , अमरावती- जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे


अंजनगाव सुर्जी च्या आसपास 28 किलोमीटर वर झालेला कोरोना (kevhid19) चा प्रादुर्भाव ज्याचा कोणताही परिणाम अंजनगाव शहरात होऊ नये. त्यासाठी रोकथांबा करण्या करिता प्रशासन सक्तीचे पावले उचलीत आहे. सामाजिक स्तरावर देखील पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून गावातील सामाजिक कार्यकर्ते काम करण्यास तय्यार आहेत. मात्र नगर पालिके मधील सदस्य जातीय तेढ निर्माण करून गावातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शहरीचे वेळी सुरु असणाऱ्या दुकानदारांना कायदेशीर अटकाव करणारे प्रशासनास जमाव करून विनाकारण अफवा फैलावून जातीय रंग देण्याचा प्रकार विशिष्ट समाजाचे लोक करित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यात नगरपालिका प्रशासनास काम करण्यास व्यत्यय येत असल्याचे देखील दिसत आहे. 
नगर पालिके मार्फत उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांनी काढलेल्या आदेशानुसार दुचाकी वाहनावर प्रतिबंध घालणारी मुनादी दिली आहे. ज्या मध्ये उद्या पासून रस्त्यावर दुचाकी चालविताना आढल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याचे सांगितल्या जात आहे. दुपारी बारा वाजता नंतर सुरु असणाऱ्या दुकादारांना पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन दंड आकारानी दिसत आहे. आज पर्येंत नप मार्फत अकरा हजार रुपये MC फंडात जमा झाले असून बेकायदेशीर दुकान चालविणाऱ्यान मध्ये दहशत निर्माण झाली आहे. मात्र काही नगर पालिका कर्मचारी दिढ महिन्याची सुटी घालून आता मिळालेल्या कर्तव्याच्या आदेशा विरुद्ध नगरसेवका जवळ जाऊन मिळणाऱ्या आदेशाचे विरोधात तक्कार करून घरी बसून कसा पगार प्राप्त होईल याचे कडे आशा लावून बसले असल्याचे देखील दिसत आहेत. अंजनगाव सुर्जी प्रशासनाच्या ह्या उत्तम कार्यवाहीत शहरवासी प्रशासना सोबत असून अशीच कार्यवाही सुरु ठेवावी अशी मागणी शहरातून होत आहे. 
*******************************
नगरसेवकानी अफवा फैलावून विनाकारण वातावरण दूषित न करता कोरोना विरोधात चालणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मदतीचा हात दिल्यास शहरातील 67000 लोकांचे रक्षण करण्यास सहकार्य करावे. कोणत्याही थोड्याश्या चुकी मुळे प्रादुर्भाव फैलविण्यात कोणतीही कसर ठेऊ नये.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image