लामजना ग्रामस्थांचा सर्कस व रहाट पाळणे कामगार व व्यावसायिकांना मदतीचा हात

 


ग्रामस्थांचा सर्कस व रहाट पाळणे कामगार व व्यावसायिकांना मदतीचा हात 


शेख सुलतान शेख अब्दुला दर्गा यात्रा (लामजना) येथे 
उत्तरप्रदेश व औरंगाबादहुन आलेल्या सर्कस व रहाट पाळणे कामगार व व्यावसायिकाना लामजना ग्रामस्थांनी केली मदत


औसा, लातूर- उपसंपादक - लक्ष्मण कांबळे 


औसा तालुक्यातील शेख सुलतान शेख अब्दुला दर्गा   यात्रा महोत्सव दरवर्षी जुन्या लामजना गावात  भरवला जातो. हा उरूस दिनांक १८ मार्च -२२मार्च या कालावधीत भरवण्यात येणार होता मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने यात्रा महोत्सव गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले होते. या यात्रेसाठी छोटेमोठे सर्कस, रहाट पाळणे कामगार व्यावसायिक लामजना येथे दिनांक १० मार्च  रोजी दाखल झाले होते.पण
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून शासनाने  यात्रा महोत्सव रद्द केले आणि लामजना येथे आलेल्या सर्कस व्यावसायिक व रहाट पाळणे कामगारांवर आर्थिक संकट ओढवले गेल्याने उपासमारीची वेळ आली. त्यांची होणारी अडचण  लक्षात घेऊन लामजना गावातील जबाबदार नागरिकांच्या पुढाकाराने या कुटूंबाना १० मार्च ते १० एप्रिल या एक महिन्याच्या आत दोन वेळा किराणा सह आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या.आहेत
या उरूस यात्रेसाठी मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी पळशी येथील  कुटुंब आपल्या  १४ सदस्यांसह रॉयल सर्कस चा  तंबू घेऊन आले होते
त्यासोबत पुण्याच्या बाबुराव येडे यांच्या मालकीचा लहान मोठे रहाटपाळणेचा व्यवसाय करण्यासाठी उत्तरप्रदेशातुन आलेले एकूण ८ कामगार आहेत. परराज्यातील कामगार हे गेल्या १० ते १५ वर्ष झाले रहाट पाळणे चालवण्यासाठी  गावोगावी येत असतात.मात्र कोरोना संचारबंदी मुळे जमावबंदी मुळे सर्कस व्यवसाय सुद्धा चालवणे कठीण होण्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे.
सर्कस व रहाट पाळणे  असे २२ लोकांची लॉकडाऊन काळात गैरसोय होऊ नये म्हणून लामजना ग्रामस्थ व  ग्रामपंचायत च्यावतीने आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या.आहेत  कोरोना संकटा मुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असता लामजना गावकऱ्यांनी आमची अडचण वेळीच लक्षात घेऊन आमाला मदत केली आहे


गुडुकुमार लालताप्रसद
गौतम -रहाट पाळणे कामगार【आम्ही रहाट पाळण्यावर कामगार म्हणून काम करत आहोंत. आमच्या व्यवसायावर अडचण येण्याने आमचे मालक सुद्धा पैशाची अडचण सोडवू शकत नाही. आमच्या अडचणी सोडवण्यासाठी लामजना ग्रामस्थांनी आवश्यक सहकार्य केले आहे.
जेंव्हा लॉकडाऊन संपेल आणि रहाट पाळणे चालतील तेंव्हाच कामाचा मोबदला दिला जाईल असे मालकाकडून सांगण्यात येत आहे. असे उत्तरप्रदेश च्या कामगारांकडून  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोध्याध्यक्ष लक्ष्मण कांबळे व ठोस प्रहारचे तालुका प्रतिनिधी प्रशांत नेटके याना वृत्तसंकलं करण्यासाठी गेले असता  बोलले


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image