प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मागणीला आले यश

 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या  मागणीला यश


 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना आजपासून पेट्रोल पंपावर मिळणार पेट्रोल


देगलूर/प्रतिनिधी- विशाल पवार


       कोरोनाच्या संकटकाळी प्रशासनाच्या खांद्याला -खांदा लावून लोकशाहीचा चौथा स्तंभ आपली भूमिका खंभिरपणे मांडत आहे. पत्रकारिता करीत असताना वास्तविकता समोर आणण्यासाठी पत्रकारांना रस्त्यावर यावं लागते तसेच अनेकांच्या संपर्कात रहावे लागते.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो कोरोनाच्या या भयानक संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार बांधव आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील सर्व प्रतिनिधीना पत्रकार देगलूर येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होत नाही ही बाब लक्षात घेऊन देगलूर येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघमहाराष्ट्र राज्यच्या  वतीने देगलूर येथील तहसिलदार अरविंद बोळगे यांना वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकारांना पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीची पूर्तता करत तहसीलदारांनी सर्व पेट्रोल पंप धारकांना, विक्रेत्यांना पत्रकारांना पेट्रोल देण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे.यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे नांदेड   जिल्हा उपाध्यक्ष विशाल पवार,तालुका अध्यक्ष अस्लम शेख,शहर अध्यक्ष हबीब रहेमान (टिपू) आदी पदाधिकारी   उपस्थित होते


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image