कोरोना प्रादुर्भाव आणि अंजनगाव सुर्जी प्रशासन
सामाजिक संघटनांनी राखली प्रशासनाची बाजू.....
महसूल प्रशासन फक्त बघ्याच्या भूमिकेत.....
महाराष्ट्र 24 आवाज
अंजनगाव सुर्जी- जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
लॉकडाऊन सुरु झाले आणि लोकांना घरात कोंडल्या गेले. स्वतः लोकांनी पंतप्रधान आदेशाचे पालन करून कोरोना (केव्हीड 19) प्रादुर्भाव थांबविण्या साठी युद्ध पातळीवर उपाय योजना सुरु झाल्या. अंगणवाडी सेविका, नगर पालिका प्रशासन, ग्रामीण रुग्णालय, आशावर्कर आणि कधी नव्हे ते एकत्रित झाले ते युवा सामाजिक कार्यकर्ते. सर्वात प्रथम सुरु झाला तो अंजनगाव सुर्जी संचारबंदी हेल्पलाईन ग्रुप. ज्या ग्रुप मार्फत संपूर्ण शहरात चहा नास्ता पुरविण्याचे कार्य हातात घेतले. संचारबंदी काळात बंद असणारे हॉटेल्स टी कॉर्नर ह्यांची उणीव प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भासू नये म्हणून चालवलेला हा उपक्रम. त्यानंतर लक्ष्मी टॉकीज ग्रुप, बुधवारा ग्रुप, माळीपुरा ग्रुप, गुरुदेव सेवा मंडळ आडगाव, गुरुदेव सेवा मंडळ अंजनगाव व अण्णाभाऊ साठे ग्रुप ह्या ग्रुप ने भोजन व्येवस्था सांभाळली. स्वतः घराचे बाहेर पडून गावातील कोणताही परिवार उपाशी झोपू नये म्हणून चालवलेला हा उपक्रम ठीक 11 वाजता व रात्री 7 वाजता जेवणाचे डबे वितरित करून वेळेवर आलेल्या सूचनांचे पालन करत होता. इतकेच नसून स्वतः घरी जाऊन जेवण करणारे हे कार्यकर्ते स्वतःचे खिच्यातून ही व्येवस्था चालविताना दिसला.
जर प्रशासनाचे भरवशावर अंजनगाव सुर्जी थांबली असती तर आज असंतोषाचे वातावरण पाहायला मिळाले असते. शासनाने पोकळ घोषणा देऊन लोकांना उत्साहित केले मात्र मदतीचा हात दिला नाही. उलट भोजन व्येवस्था संभांळणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन न करता द्यायचे असल्यास प्रशासनाला दान द्या असे म्हणणाऱ्या प्रशासनाने कितपत मदत लोकांना पुरविली असेल हा प्रश्न चर्चेत आहे. शासनाने तीन महिन्याचे वाटपाची घोषणा केली मात्र अंजनगाव सुर्जी मध्ये एकच महिन्याचे राशन वाटप झाले. ते देखील सामाजिक स्तरावर मूलभूत व्येवस्था पुरवठा झाल्या नंतर. ह्या उपर अन्यायाचा कळस म्हणजे BDO भालके यांनी तालुक्यातील कोणत्याही गावात पायदळ, वाहनात प्रवास करणारे मजूर पकडून त्यांना अंजनगाव सुर्जी शहरात आश्रित केले. ज्यांची व्येवस्था अंजनगाव सुर्जी सामाजिक संघटनांनवर लाधली. मात्र तरी देखील खंभीर पणे उभे राहून अंजनगाव सुर्जीच्या नागरिकांनी बाजू राखली त्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान.
बंडूभाऊ हंतोडकर, विपुल नाथे, ब्रिजलाल झंवर, विजय गौर, प्रिन्स अग्रवाल, संदीप राठी, पवन सारडा, परमेश्वर श्रीवास्तव, पंकज राठी, गजानन चौधरी, ड्रा. नंदकिशोर पाटील, निलेश अग्रवाल, फारूख खान, प्रफुल्ल गवई, अक्षय गवळी, चेतन सारंदे, अक्षय मुरकुटे सारखे अनेक कार्यकर्ते ज्यांनी कळतं न कळतं सहकार्य केले व करत आहेत त्यांना मानाचा मुजरा. प्रेस संपादक v पत्रकार सेवा संघ जिल्हा उपाध्येक्ष व जनमाध्यम शहर प्रतिनिधी गजानन हुरपडे यांचे तर्फे धन्यवाद...
*******************************
लॉकडाऊन असताना आपल्या जीवाची पर्वा न करता सतत लोकांची काळजी बाळगणाऱ्या प्रशासनातील कार्यरत पोलकर साहेब, आरोग्य अधिकारी डोंगरे साहेब, नायब तहसिलदार सोळंखे साहेब, गोविंद त्रिपुरारी, ड्रा. काळमेघ मॅडम, अमोल वऱ्हाळे, सेवा निवृत्त सैनिक, पोलीस प्रशासन, अंगणवाडी सेविका, आशावर्कर व ज्या शाळेत मजूर संशयित आश्रित होते त्या शाळेचे कर्मचारी ज्यांचे उत्तम व्येवस्थे मुळे अंजनगाव सुर्जी शहराचे नाव कायम राहले व पुढे देखील राहील.