प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ (रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेला मुख्यमंत्री कार्यालयाचे आले उत्तर
वृत्तपत्राचे घरोघरी होणार वितरण
मुंबई- प्रतिनिधी- महाराष्ट्र 24 आवाज
दि. 21/4/2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र छपाईसाठी परवानगी देण्यात आली होती परंतु वृत्तपत्र घरोघरी वितरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती. या संदर्भात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ (रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी. टी.यांनी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांना दि 18/ एप्रिल/ 2020 रोजी ईमेलद्वारे वृत्तपत्र वितरणावरील निर्बंध तातडीने मागे घ्यावे अशी मागणी केली होती. त्या मागणीची मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांनी दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने केलेल्या मागणीचा संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले असल्याचे मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून दि 21/4/ 2020 रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाला ईमेलद्वारे कळविण्यात आले आहे. त्याबद्दल मा मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे साहेब यांचे संघटनेचे वतीने धन्यवाद!
मुबंई,पुणे महानगर प्रादेशिक विभाग वगळून राज्यभरात काही अटीवर वृत्तपत्राचे घरोघरी वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये वितरक व स्विकारणारी व्यक्ती यांना कोरोना विषाणूंचा प्रार्दूभाव होऊ नये यासाठी दिलेल्या नियमांच्या अनुषंगाने सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करणे हे बंधनकारक आहे. तसेच शासनाच्या इतर सर्व नियमांचे आणि सुचनांचे पालन करणेही बंधनकारक राहील. या नियमानुसार वृत्तपत्र घरोघरी वितरणास परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे साहेब आणि राज्य शासनाचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ (रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आभार! महाराष्ट्रातील सर्व संपादक व पत्रकारांचे अभिनंदन!