प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यपदी संपादक दिपक साबळे यांची निवड

 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी दिपक साबळे यांची निवड..!
 
 संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी.टी आंबेगावे यांनी केली निवड जाहीर



पुणे (प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड शहरात  अतिशय उत्तम आणि प्रभावीपणे जनतेचे प्रश्न समोर ठेवत त्यांना न्याय देण्याचे आणि सामाजिक बांधिलकी जपत वंचित घटकांना समोर ठेवत त्याचे प्रश्न मांडून त्यांना सहकार्य करण्याचे काम आजपर्यंत वास्तव संघर्षचे संपादक दिपक साबळे  यांनी केले.  सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजुना मदत करण्याचे काम ते समाजातील बांधवाना घेऊन करत असून पत्रकारिता ही अत्यंत प्रभावीपणे करतात याची दखल घेत दिपक साबळे यांची पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी निवड करण्यात आली आहे. ही संघटना महाराष्ट्रातील संपादक व पत्रकारांच्या न्याय, हक्क, कल्याण, उत्कर्ष व शासकीय सुविधा मिळवून देण्यासाठी काम करत आहे.आतापर्यंत महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना संघटनेने  न्याय मिळवून दिलेला आहे. संपादक व पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे. या संघटनेचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून संपादक दिपक साबळे काम करणार आहेत. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवाचा संघटनेला निश्चितच फायदा होणार आहे म्हणून प्रेस संपादक व पञकार सेवा संघ या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी.टी आंबेगावे यांनी ही  निवड सर्वानुमते जाहीर केली आहे. या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image