मुंबईहून आलेला जावई घरात ठेवला लपवून !

 


मुंबईहून आलेला जावाई घरात ठेवला लपवून !


 - प्रशासनाला चार दिवसांपासून पत्ताच नाही.
- मांजरा कारखान्याच्या कॉलनीत खळबळ


लातुर :  ( व्यंकट पनाळे) 
 विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथील कर्मचारी  यांनी मुंबई येथुन चार दिवसापूर्वी लातूरला आलेले जावयास कोणालाही न कळु देता,  मांजरा कॉलनीत लपवुन ठेवल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या कामगाराचे  जावाई हे मुंबई कडे पालघर भागात रहातात. ते चार दिवसापुर्वी  मुंबई येथुन लॉकडाऊन असताना लातुरला आलेच कसे ? आणि त्यांनी प्रशासनाला न सांगता चार दिवस जावायास घरात लपवुन ठेवलेच कसे? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
  जावाई घरी आल्यापासुन सासु सासरे असलेल्या या पती-पत्नीचा घराबाहेर किराणा दुकानदार, पिठाची गिरणी, अशा ठिकानी बारा नंबर पाटी, शाम नगर येथे किती ठिकाणी संपर्क झाला असेल. त्यांच्या संपर्कात किती लोक आले,  हे पाहणे प्रशासना पुढे आव्हान आहे.
आज सकाळी लपवलेल्या जावाईबुवाला खोकला घरात बसु देईना त्यामुळे हे बिंग उघडे पडले.
 आता जावयास शासकिय रुग्णालयात दाखल केले असुन मेडिकल रिपोर्ट येणे बाकी आहे. तुर्त मांजरा कारखान्याच्या मांजरा कॉलनीत भीतीचे वातावरण आहे.


   - व्यंकट पनाळे, पत्रकार,             लातूर. ९४२२०७२९४८


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image