1
मुक्या भुकेल्यांना अव्होपाची "बोलकी" साद!
उदगीर - प्रतिनिधी- महादेव महाजन
महाराष्ट्र 24 आवाज
कोरोनाकाळात मुक्या अनाथ पशूंच्या मुक्या भुकेला अन्नरूपी साद देण्याचे कार्य उदगीर येथील *आर्यवैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशन(अव्होपा )उदगीर या सामाजिक संघटनेने सुरू केले आहे.मान्यवरांच्या उपस्थितीत हा खाद्यरथ मुक्या पशुंच्या भुकमुक्तीसाठी रवाना करण्यात आला.
उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या आवाहनानुसार अव्होपा ने पुढाकार घेऊन मुक्या पशूंच्या खाद्यसेवेला बुधवारी प्रारंभ केला.तहसीलदार व्यंकटेश मुंढे,मुख्याधिकारी भरत राठोड, न.प.चे उपाध्यक्ष सुधीर भोसले,प्रा.डॉ .अनिल भिकाणे,सामाजिक कार्यकर्ते धनंजय गुडसूरकर यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात करण्यात आली.शहरातील अनाथ पशुंना लाॕकडाऊनच्या काळात अन्न मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे,यामुळे या जनावरांच्यासाठी घरातील उरलेले अन्न द्यावे असे आवाहन मुख्याधिकारी भरत राठोड यांनी केले होते.आव्होपा ने त्यापुढचे पाऊल टाकत पशुखाद्य खरेदी करुन या जनावरांना पुरविण्याचा उपक्रम सुरू केला असून दररोज सकाळी अव्होपाचे कार्यकर्ते यासाठी तीन तास योगदान देणार आहेत. सचिव प्रा.सुनिल वट्टमवार
उपाध्यक्ष डॉ.चंदावार तानाजी,कोषाध्यक्ष बालाजी बुन्नावार,सहसचिव डॉ व्यंकटेश वट्टमवार, सल्लागार बालाजी जगळपुरे,कार्यकारणी सदस्य डॉ.व्यंकटेश मलगे,प्रा.संजय संगूळगे,प्रोजेक्ट प्रमुख कपिल पोलावार, देविदास पारसेवार,महेश गादेवार, गणेश चिद्रेवार, बालाजी पत्तेवार,संजय पत्तेवार,प्रदीप महाजन, अनिल मारमवार,उल्हास मोरलवार,दीपक आलेगावकर यावेळी उपस्थित होते.
----------------------------------
शहरातील अनाथ जनावरांची क्षुधाशांती करण्यासाठी अव्होपाची टीम सज्ज असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.यासाठी आर्थिक योगदान देणाऱ्याचे आव्होपा आभारी आहे.