पतीच्या अंत्ययसंस्कारासाठी पत्नीची मदतीची याचना!

 


पतीच्या अंत्यसंस्कारासाठी
पत्नीची मदतीची याचना..!


लातूर- : जिल्हा प्रतिनिधी- व्यंकट पनाळे


 ' भाऊ, लिव्हरच्या त्रासामुळे नवऱ्याला चार दिवसांपूर्वी सरकारी दवाखान्यात अॕडमिट केलं होतं, आज डॉक्टरांनी सांगितलं,  तुमच्या पेशेंटला घरी घेवून जा, दुपारी एक वाजता घरी आणलं अन संध्याकाळी पाच वाजता नवरा गेला. बारा वर्षाचा मुलगा आणि मी आता काय करू ! आमचे इथे कोणीही नाही, नातेवाईकही येवू शकत नाही,  पतीवर अंत्यसंस्कार कसे करू? '  असा टाहो जयश्री महेश स्वामी नामक महिला करत होती... मात्र या असाहाय्य महिलेच्या मदतीला कोणीच धावून येत नव्हते . लातुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गल्लितील हा दुःखद प्रसंग.. 
 आम्ही म्हणजे हरंगुळचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे आणि मी काही गरीब, गरजु लोकांना अन्नधान्याची मदत करून घराकड़े परत जात होतो, तेवढ्यात व्यंकटराव पनाळे भाऊना फोन आला की, जिल्हाधिकारी कार्यलायसमोरिल एका छोट्या होटेलमध्ये अशी घटना घडली आहे. लागलीच भाऊनी गाडी शहराकड़े वळवली.. 
श्री साईंनंदनवन नावाच्या छोट्या हॉटेलात पतीच्या मृतदेहाजवळ पत्नी आणि लहान मुलगा रडत होते.. पनाळे भाउनी विचारपुस करून सगळी माहिती घेतली आणि सांत्वन करुन धीरही दिला. रस्त्याने जाणाऱ्या पोलिस गाड़ीला थांबवून त्यांना सांगितले,  त्यांनी सरकारी दवाखाण्यात फोन करून आम्ही डॉक्टर पाठवून देतो पाठवून देतो म्हणाले..
आम्ही एमआयडीसी पोलिसांनाही कळवले. जिल्हाधिकारी कार्यालयात फोन लावले..  आरोग्य अधिकाऱ्याना फोन लावले..  कोणीच फोन उचलत नव्हते..  अखेर मनपाचे स्थायी समितीचे सभापती अॕड दीपक मठपती यानी फोन उचलला.. पनाळे भाउनी त्यांना सविस्तर घटना आणि समस्या सांगितली..  मनपाचे आपत्ती व्यवस्थापन पथक उद्या सकाळी येवून त्या मृतावर अंत्यविधी करतील, असे मठपती यानी सांगितले..  तेव्हा कुठे हा अंत्यविधिचा प्रश्न मार्गी लागला.. मात्र ज्या पोलिसांना ही घटना सांगितली होती त्यांनी सिव्हील हॉस्पिटल येथून संबधित पेशंटची माहिती घेतली शिवाय एका सेवाभावी संस्थेला कल्पना दिली. त्यानंतर त्या संस्थेने रात्री ११  च्या सुमारास खाड़गांव स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले.  जंगम  समाजात त्यांच्या परंपरेनुसार धर्मविधिनुसार मृतास दफन केले जाते, परंतु खोदन्यासाठी माणसे कमी असल्याने अग्नीसंस्कार करण्यात आले.  आणि ही समस्या सुटली..
सध्या कोरोना या महामारीमुळे सगळेच धास्तावले आहेत. लॉकडाऊनमुळे सारेच ठप्प आहे. अनेकांचे नातेवाईक विविध गांवात शहरात अङकुन पडले आहेत. कुणाच्या मौतीलाही जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत एकटे पडलेल्या गरीब कुटुंबाने मयत व्यक्तिवर अंत्यसंस्कार कसे करायचे ?  हा गंभीर प्रश्न आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image