माणगाव पोलिस ठाणे गुड माॅर्निंग गस्त पथकाची धडक कारवाई-विदेशी दारूसह अवैध वाहतूक व विक्रेत्यावर गुन्हा दाखल

 


माणगांव पोलीस ठाणे गुड माँर्निंग गस्त पथकाची धडक कारवाई- विदेशी दारुसह अवैध वाहतुक व विक्रेत्यावर गुन्हा दाखल.


महाराष्ट्र 24 आवाज


माणगाव- प्रतिनिधी- प्रसाद गोरेगावकर 


    सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरीता घोषित केलेल्या संचार बंदी काळात बिअर शॉप, वाईन शॉप परमिट रुम इत्यादींना सर्व प्रकारचे दारु विक्रीवर शासनाने निर्बंध घातले असताना देखील माणगांव पोलीस ठाणे हद्दीत सदर नियमांचे उल्लंघन केले बाबत गुन्हे दाखल आहेत.
 माणगांव पोलीस ठाण्याच्या गुड माँर्निंग गस्त पथकाचे अधिकारी दि 25 एप्रिल. रोजी सकाऴी गस्त घालत असताना पावणे आठच्या सुमारास कचेरी रोड मार्गे वाकडाई मंदीराकडे जाताना उतेखोल कालवा पुलावर मोटारसायकल  अँक्टीव्हा क्र एम एच 01अे क्यु 7116 विनापरवाना दारुची वाहतुक करताना गाडीवर रुपेश गौतम जाधव (वय 28) रा.खर्डी बुद्रुक तसेच शुभम विश्वास शेलार (वय 20) रा खर्डी बुद्रुक हे इसम माणगांव पोलीस गुड माँर्निग पथकाला आढऴुन आले तपासाअंती त्यांच्याकडे 48 सिलबंद विदेशी दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत,सापडलेला सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस उपनिरीक्षक करे यांनी तसा पंचनामा केला आहे. सदर इसमांवर शासनाच्या कोरोना विषाणुचा प्रसार थांबविण्यासाठी योजलेल्या अध्यादेशाची अवमान्यता केली व दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 अ व 83 भा.दं वि.कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
  सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक करे अंमलदार गीते व पोलीस हवालदार दोडकुऴकर ,सु.धा .पाटील पोलीस नाईक बाऴा पाटील, पोलीस शिपाई गोविंद तलवारे व महीला पोलीस नाईक ओमले करत आहेत.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image