जामगाव ग्रामपंचायतीच्या वतीने एक हात मदतीचा!

 


जामगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 
   एक हात मदतीचा ! 


गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 


जामगाव,रोहा- उपसंपादक समीर बामुगडे
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नसल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याच पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत जामगावचे सरपंच "सौ. दर्शना म्हशिलकर , सदस्य , युवा कार्यकर्ते प्रशांत म्हशिलकर , पंचक्रोशीतील जेष्ठ - श्रेष्ठ यांच्या सहकार्याने" एक हात मदतीचा या उपक्रमांत जामगाव पंचायतीतील गरजू लोकांना जीवनावश्यक साहित्य सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत मोलमजुरी करणाऱ्या 170 कुटुंबाना गोडेतेल, तुरडाळ, तिखट , कांदे - बटाटे , हळद इत्यादी अत्यावश्यक किराणा मालाचे घरोघर जाऊन वाटप करण्यात आले.
पंचक्रोशीतील मदतीचा हातभार लावणार्‍या व्यक्ती प्रशांत म्हशिलकर,श्रीधर गावडे,गंगाराम सरफळे ,मंगेश जाधव,सदाशिव कोदे, शिवकृपा मित्र मंडळ जामगाव,नंदकुमार आडलिकर,मधुकर कोदे, मंगेश फोपे,रविकांत कोदे,रमेश जांभळे,श्रीधर साठे,लहु पुराडकर,बाळकृष्ण कोदे, संदेश कोदे, दत्ता कोदे,ग्रामसेवक इंगळे,गणेश कोदे यांचे सहकार्य लाभले. मदतनीसांचे , शिवकृपा मित्र मंडळातर्फे आभार मानण्यात आले .ग्रामस्थांनी एकत्र येऊन वेळीच मदत केल्याबद्दल , पंचक्रोशीत तसेच मुंबईकर मित्र मंडळातर्फे सर्वांचे कौतुक होत आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image