सरपंच जयश्रीताई पोळ यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत जुना धामणगाव येथे बसविण्यात आली सेनेटायझर मशीन
धामणगाव रेल्वे, अमरावती - प्रतिनिधी- अतुल टाले
_सध्या संपुर्ण जगभरात जीवघेण्या कोरोना वायरसने आपले थैमान घातले असून आपल्या भारत देशातील विवीध राज्यामधे हा वायरस झपाट्याने पसरत आहे...दिवसान दिवस या कोरोना वायरसचे रूग्न संपुर्ण भारतात वाढतच चाल्लेले आहे...या कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी डाँक्टर, पोलीस कर्मचारी, सफाई कामदार रात्रीचा दिवस करून घरावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र झटत आहे...!_
_संपुर्ण देश कोरोना या महामारीने त्रस्त आहे...जिकडे तिकडे वेगवेगळ्या पातळीवर स्वच्छतेची जबाबदारी ठेवल्या जात आहे...प्रत्तेक गावामधे वेगवेगळ्या फवारण्या, अनेक शासकीय आँफीमधे सेनेटायझर मशीन सुद्धा बसवन्यात आलेल्या आहे...या सर्व घटनेची दखल घेत धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव ग्रामपंचायत तर्फे आज दिनांक १५ एप्रिल रोजी आपल्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी जुना धामणगाव ग्रामपंचायत सरपंच जयश्री विशाल पोळ यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतच्या गेटवर सेनेटायझर मशीन बसवीण्यात आलेली आहे...मशीन बसवतेवेळी जुऩा धामणगाव ग्रामविकास अधिकारी आर बी अहेरवार, विस्तार अधिकारी मुळे साहेब, सामाजिक कार्यकर्ते विशाल पोळ व आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते...!_
_ग्रामपंचायत कर्मचारी व जनतेच्या सुरक्षिततेसाठी हि मशीन ग्रामपंचायतीच्या पुढिल गेटवर बसवीण्यात आली असे जुना धामणगाव ग्रामवीकास अधिकारी आर बी अहेरवार म्हणाले...!_