माणुसकीची भिंत-एक हात मदतीचा, यंग स्टार क्रिकेट संघाचा स्तुत्य उपक्रम
गोरेगाव- प्रतिनिधी- प्रसाद गोरेगावकर
महाराष्ट्र 24 आवाज
एकमेंका सहाह्य करु अवघे धरु सुपंथ” या वरिल उपक्रमाअंतर्गत म्हणजेच यंग स्टार क्रिकेट संघ हरकोल कोंड गेले काही वर्ष सारी मुलं एकत्रित येवून सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबवत असतात व यापुढे ही असे उपक्रम निरंतर प्रत्यक्षात राबवतील यात तिळमात्र शंकाच नाही.खरं पाहता यंग स्टार क्रिकेट संघ हा वर्षभरात क्रिकेट खेळत असताना कधी यश मिळतो तर कधी अपयश परंतू ज्या- ज्या ठिकाणी यश मिळतं त्यामधून काही रक्कम समाज कार्यास तर कधी अतिशय बिकट परिस्थिती असलेल्या व्यक्तीस तर कधी आजारीग्रस्तास सढल हस्ते मदत करत असतात.
सध्याची परिस्थिती पाहता पुर्ण जग हा कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला असून जणू काही विळखाच घातला आहे.अशा परिस्थितीत संपूर्ण भारत लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब कुटुंबाना दि 24 एप्रिल 2020 रोजी हरकोल कोंड गावात प्रत्येकाच्या घरात जावून प्रत्यक्षपणे आम्ही गरजेच्या वस्तू (कांदे, बटाटी, साखर, चहापावडर, साबण व बिस्कीट) यांचा वाटप करण्यात आले. हे सर्व कार्य पाहता स्थानिक ग्रामस्थांकडून व महिला मंडळाकडून आम्हा यंग स्टार क्रिकेट संघावर कौतुकाची थाप व अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आले.