प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षपदी मंदाताई बनसोडे यांची निवड

 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षपदी मंदाताई बनसोडे यांची निवड 


पुणे- प्रतिनिधी 
प्रेस संपादक व पञकार सेवा  संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी.टी आंबेगावे  यांच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षा म्हणून आवाज भारताच्या संपादिका मंदाताई  बनसोडे यांची दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी बैठक घेवून निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे पिंपरी चिंचवड मधील महिला पञकारांना ही न्याय मिळत असून त्यांच्या लेखणीचा सन्मान होत आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रातील संपादक व पत्रकारांच्या न्याय, हक्क, कल्याण, उत्कर्ष व उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असून संघटनेत महिला पत्रकारांचा योग्य सन्मान केला जातोय.पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना किती अडचणी येतात हे सर्वश्रुत आहे .तरीही या माध्यमातून सामाजिक ,राजकीय,तसेच अनेक विषयांवर आपले लेखन  याठिकाणी पत्रकार यांच्या मार्फत होते. समाजातील वंचित,पीडित,व गरजू व्यक्तीला मदत करण्याचे काम संपादिका मंदाताई बनसोडे सातत्याने करीत  असून महामानवांचे विचार सर्व स्तरावर पोहचले पाहिजेत  हा प्रामाणिक उद्देश त्यांनी डोळ्या समोर ठेवलेला आहे. त्यांच्या निवडी मुळे अनेक स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image