प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य संघटकपदी ह्युमन राईट्स वाॅईस या वर्तमानपत्राचे वरीष्ठ उपसंपादक रमेश मोपकर यांची निवड

 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ (रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य संघटकपदी ह्युमन राईट्स वाॅईस या वर्तमानपत्राचे वरीष्ठ उपसंपादक श्री. रमेश मोपकर यांची निवड 


महाराष्ट्र 24 आवाज 


मुंबई- प्रतिनिधी- महेश कदम  


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ  (रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य संघटकपदी ह्युमन राईट्स वाॅईस या वर्तमानपत्राचे डॅशिंग उपसंपादक श्री रमेश मोपकर यांची निवड करण्यात आली आहे. 
 रमेश मोपकर गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा विचार करून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी. टी. व राज्य कार्यकारिणीने श्री रमेश मोपकर यांची संघटनेचे राज्य संघटकपदी निवड केलेली  आहे. 
 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सातत्याने संपादक व पत्रकारांच्या न्याय, हक्क, उत्कर्ष, उन्नती, आरोग्य यासाठी कार्य करीत आहे. संपादक व पत्रकारांना विविध शासकीय योजना मिळवून देणे, विमा संरक्षण, मोफत प्रवास योजना, आवास योजना, पत्रकारांना टोल माफी, संपादक व पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा मिळवून देऊन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लावणे असे विविध प्रकारचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रात मोठ्या जोमाने काम करत आहे.  संघटनेसाठी ह्युमन राईट्स वाॅईस  या वर्तमानपत्राचे वरीष्ठ उपसंपादक श्री रमेश मोपकर यांच्या अनुभवाचा संपादक व पत्रकारांच्या कल्याणासाठी नक्कीच लाभ होईल. श्री मोपकर  यांची राज्य संघटकपदी निवड केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image