श्रीवर्धनमध्ये आढळला कोरोनाचा रूग्ण

श्रीवर्धनमध्ये आढळला  कोरोनाचा रुग्ण 


सर्वांनी लाॅकडाऊनचे नियम पाळण्याची आवश्यकता 


श्रीवर्धन(सावन तवसाळकर ):- श्रीवर्धनमध्ये एका रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे .प्राप्त माहिती  संबधित व्यक्ती  ०४ एप्रिलला श्रीवर्धनमध्ये आली असता त्यास कोरोनांची प्राथमिक लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली .त्यानंतर संबधित व्यक्तीला श्रीवर्धन सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्यानंतर पुढील चाचणीसाठी त्यास पनवेल येथील   एम जी एम रुग्णालयात वर्ग करण्यात आले .संबधित व्यक्तीचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . तालुका प्रशासनाने संबधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी पाठवले असल्याचे समजते .राज्य सरकारने सर्वत्र लॉकडाऊन करून सुद्धा वरळी येथील व्यक्ती श्रीवर्धनमध्ये कसा पोहचला या विषयी प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे .कारण संबधित व्यक्ती श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी मुक्त संचार केल्याची शक्यता नाकारता येत नाही .आता श्रीवर्धन तालुका प्रशासनासमोर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आहे .कारण सर्वत्र लॉकडाऊन असून सुद्धा नागरिक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाहीत .रुग्ण आढळलेल्या विभागाच्या ०३ किमी पर्यंतचा परिसर काही काळासाठी बंदिस्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही . श्रीवर्धन शहरातील किराणा दुकान व भाजीपाला विक्रेते यांनी यापूर्वीच दुपारी एकच्या नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र सकाळी सर्वत्र गर्दी आढळून येते .नगरपालिकेने आखणी करून दिलेल्या चौकोनात कुणीच सुरक्षित अंतर ठेवून उभे राहत नाही .तसेच दुकानदार सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात .आगामी काळात श्रीवर्धन मधील  लोकांना कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे  .अन्यथा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही .


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image