श्रीवर्धन तालुक्यात सापडला पहिला कोरोना बाधित रूग्ण तालुक्यात खळबळ
श्रीवर्धन- प्रतिनिधी- रामचंद्र घोडमोडे
श्रीवर्धन मधील भोस्ते गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे भोस्ते गावातील एका व्यक्तीला कोरोणाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. ही व्यक्ती मुंबईमधील वरळीमधून आपल्या मूळ गावी आली होती या व्यक्तीला अस्वथ वाटत असल्यामुळे रुग्णालयत दाखल करण्यात आले होते. श्रीवर्धन मधील शासकीय रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर सदर व्यक्तीला पुढील टेस्टसाठी पनवेल येतील एम जी एम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. खबरदारी म्हणून सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणी साठी पनवेल इथे पाठविण्यात आले आहे.श्रीवर्धन तालुक्यातील अनेक चाकरमानी गावी आले आहेत. श्रीवर्धन मधील बाजारपेठ सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येत असून भाजी मार्केट मच्छी मार्केट किराणा दुकान इत्यादी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियम (सोशल डिस्टसिंग ),नियम पाळण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.सदर कोरोना बाधित व्यक्ती व तालुक्यात आलेले चाकरमानी संचारबंदी असताना मुंबईतून या व्यक्ती श्रीवर्धनपर्यंत कशा पोहचल्या अशी कुजबुज नागरिकांमध्ये होत आहे.