येथे मिळते खूलेआम दारू

येथे देशी दारु खुले आम मिळते


लातुर : प्रतिनिधी - व्यंकट पनाळे सध्या कोरोना रोगाने संपुर्ण जग भयभीत झाले आहे. मा.  पंतप्रधानानी तर 21 दिवस घराच्या बाहेर येण्यास बंदी घातली आहे. मा. मुख्यमंत्री यानी पण कठोर पाउले उचलली आहेत. महाराष्टृाचे मा. ग्रहमंत्री यानी तर पोलीसाना काठीला तेल लावायला सांगीतले आहे. हे सगळे खटाटोप लोकांचे जीव वाचवण्यासाठी केले जात आहेत. संपुर्ण संचारबंदी चालू आहे. मात्र जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानापासुन केवळ तीन किलोमिटर अंतरावर आणि एम आय डी सी  पोलीस स्टेशन पासुन चार किलोमिटर अंतरावर खुलेआम हातभट्टीची दारु व देशी दारु विकली जात आहे .
स्वतःच्या बिल्डींग मध्ये एक खिडकी योजना चालवली जात आहे. 
कोरोनामुळे सर्व परवानाधारकांचे  व्यवसाय बंद असले तरी याचा धंदा विनापरवाना असले कारणाने पोलीसाना याचा थांगपत्ता ही नाही. 
हरंगुळ (बु) ग्रामपंचायत क्षेत्रात विश्वकर्मा मंदिराच्या जवळ रेल्वे पटरीवर बसुन हे लोक हातभट्टी ची दारु पित आहेत. तेथुन दोनसे मिटरवर "उत्तम" हातभट्टीची दारु चोविस तास पुरवली जात आहे.
   हरंगुळ (बु) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात,  याच घरातुन हातभट्टी ची दारु ग्रहाकाला दिली जाते.  दारु विक्रीसाठी चोविस तास सुरु असलेली एक खिडकी योजना सोबतचे फोटोत दिसत आहे. 
  हा धंदा चांगला चालावा यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील कांही मान्यवराना हप्ता दिला जातो.
तेंव्हा प्रशासनाने योग्य ती दखल घेवून कडक कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.हे सर्व  व्हिडिओ आणि फोटो दिनांक  ३१/०३/२०२० वार मंगळवार रोजीची सायंकाळी सहा नंतरची  असुन याना कोरोनाची  भिती नाही.
संचारबंदीची तर अजिबात नाही.
पोलीस तर कोरोनाच्या  बंदोबस्तता आहेत. 
या परिसरातील नागरिकांंना दारुडया लोकाच्या त्रासापासुन मुक्त करण्यासाठी आता जिल्हाधिकारी साहेब काय कार्यवाही करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image