पत्रकार बांधवांना आवाहन ! लाॅकडाऊनच्या काळातील पत्रकारांच्या समस्या लिहून किंवा विडीओ करून पाठवा

 


पत्रकार बांधवांना आवाहन, लाॅकडाऊनच्या काळातील समस्या लिहून किंवा विडीओ करून पाठवा 


 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य ही संघटना घेणार पत्रकारांच्या समस्या व प्रश्नांची दखल.


महाराष्ट्रातील सर्व संपादक व पत्रकार बांधवांना आवाहन करण्यात येते की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात काही पत्रकारांवर लाठीमार करण्यात आला, काही पत्रकारांना नोटीस बजावण्यात आली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डाॅक्टर, पोलिस, नर्स यांच्यासारखेच आपला जीव धोक्यात घालून पत्रकार बांधव कोरोनाची बातमी संकलन करणेसाठी सातत्याने बाहेर फिरत आहेत पण शासनाने  पत्रकारांना अद्यापही कोणतीच मदत जाहीर केलेली नाही. ना विमा संरक्षण, ना पॅकेज! पत्रकारांनी जीव धोक्यात घालायचा आणि समाजापर्यंत बातमी पोहोचवायची, राजकीय मंडळीची प्रसिद्धी करायची, रात्रंदिवस देशवासीयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा पत्रकारचं का वंचित राहीला ? पत्रकारांना कोणत्याही प्रकारचा शासकीय पगार मिळत नाही, मानधन मिळत नाही , सध्या जाहिराती बंद आहेत मग पत्रकारांनी जगायचं कसं? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागात तर पत्रकारांच्या चुली बंद होण्याची वेळ आलेली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मात्र यावेळी दूर्लक्षित राहीला याला जबाबदार कोण? 
सध्या पत्रकारांची आठवण कोणत्याही राजकीय नेत्यांना येत नाही, सध्या पत्रकार बातमी देतात बातमी प्रसिद्ध होते बातमी  सर्वांपर्यत पोहचतेय आणि पत्रकार मात्र उद्याच्या आशेवर आज उपाशी जगतोय. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व संपादक व पत्रकार बांधवांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे आवाहन आहे की, लाॅकडाऊनच्या काळात ज्या संपादक किंवा पत्रकारांना ज्या ज्या समस्यांना सामोरे जावे लागले ती समस्या 10 ते 15 ओळीत लिहून पाठवा किंवा 30 ते 60 सेकंदाचा विडीओ करून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी. टी. यांच्या 9270559092 या व्हाट्सअॅपवर दि. 14 / एप्रिल/ 2020 पर्यंत पाठवावे पत्रकारांच्या प्रत्येक समस्येची संघटना दखल घेऊन त्यावर उपााययोजना करण्यात येेेणार आहे.


धन्यवाद!


आपला 
 आंबेगावे डी. टी.
 संस्थापक अध्यक्ष
 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य
 मो.9270559092  / 7499177411


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image