मॅक्स स्पेअर कंपनीचा अनोखा उपक्रम, वावोशी, खोपोली, पनवेल येथिल आरोग्य केंद्रांना मास्क आणि सॅनिटाइझरचे वाटप
वावोशी/संतोष शेवाळे - जगभरातील अनेक ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देशभर ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. अशा स्थितीमध्ये अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूचे वाटप तसेच काही ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मॅक्स प्लेयर कंपनीचे व्यवस्थापक सुनील शेवाळे आणि त्यांचे सहकारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपणही या युद्धात खारीचा वाटा उचलला पाहिजे या जाणिवेतून त्यांच्या कंपनीमार्फत वावोशी, खोपोली, पनवेल इत्यादी आरोग्य केंद्र आणि पोलिस स्टेशन यांना फुल मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. तसेच या कंपनीमध्ये व्हेंटिलेटरचे विविध प्रकारचे भाग तयार करण्यात येत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू हॉस्पिटलमध्ये ते कोणत्याही प्रकारचे पैसे न आकारता व्हेंटिलेटर संदर्भातील साहित्यदेखील मोफत वाटप करित आहेत. त्यांच्या या कार्याचे वावोशी आरोग्य केंद्राच्या डॉ. सीमा पाईकराव, डॉ. प्रियांका पाटील, सर्व कर्मचारी यांनी आभार व्यक्त करित कौतुक केले आहे.