सिलेंडरला आग, अंजनगाव सुर्जी काठीपुरा येथे अचानक झाला हादसा
अंजनगाव नगर परिषदची अग्निशमन नादुरुस्त
आग विझल्यावर अंजनगावात अचलपूर दर्यापूरच्या अग्निशमन दाखल
महाराष्ट्र 24 आवाज
अंजनगाव सुर्जी- जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अंजनगाव सुर्जी काठीपुरा येथील नारायण रमेश कोकाटे यांचे घरी अचानक सिलेंडरला आग लागली मात्र काठीपुरा येथील नागरिकांचे सहकार्याने आग विझविणास मोठी मद्दत झाली ज्यामुळे कोणत्याच प्रकारची जीवहानी अथवा मालहानी झाली नाही.
आज सायंकाळी स्वयंपाक करताना सिलेंडरला आग लागली. संचारबंदी मुळे घरातच असणाऱ्या नागरिकांना आरडाओरड ऐकू आली. त्यांनी पोलीस स्टेशनं व नगर परिषदला फोन लावला मात्र नगर परिषदेची अग्निशमन नादुरुस्त असल्यामुळे अचलपूर व दर्यापूर येथून अग्निशमन बोलावल्या मात्र नागरिकांनी आग विझविल्या नंतर त्या घटनास्थळी पोहचल्या. तिथं पर्येंत नायटकर परिवाराने स्वतःचे घरातुन पाणी देऊन वि मयूर नायटकर, अमोल वऱ्हाडे आनंद कुऱ्हेकर विक्की जायदे, गौरव जायदे, चेतन सोनोने, आकाश राऊत, विक्की राऊत, पुरुषोत्तम फुलारी, सादिक बिल्डर, मो. कादिर, राम भलतड्क, मो. अजीज यांचे अथक प्रयासाने आग विझली ज्यामुळे सुमारे 60 क्विंटल कापूस, गहू, चार सिलेंडर ज्या पैकी दोनला आग लागली मात्र अन्य नुकसान वाचले. ज्यामुळे सर्वानी त्यांचा सतर्कतेचे आभार मानले. पोलीस निरीक्षक राठोड, PSI पोलकर, API मशरे, PSI जवरे, नगरसेवक सचिन जायदे, कृष्णा गोमासे व काठीपुरा येथील नागरिक यांची मद्दत झाली.
***********************************
अग्निशमन न पोहचल्या वरुण काठीपुरा नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. चार दिवसापूर्वी नादुरुस्त झालेली अग्निशमन तात्काळ का दुरुस्त झाली नाही अशी विचारणा देखील नगरसेवकाना केल्या गेली. तसेच आग विझल्या नंतर घटनास्थळी पोहचलेल्या अचलपूर व दर्यापूर येथील अग्निशमनचे टाळ्या वाजवुन प्रतीकात्मक स्वागत केले.