निराधार विधवा परित्यक्त्या दुर्बल ४८ कुटुंबीयांना धान्य व साहित्य वाटप.
महाराष्ट्र 24 आवाज
जिल्हा प्रतिनिधी- व्यंकट पनाळे
लातुर : कोरोणामुळे अडचणीत सापडलेल्या अनेक कुटुंबांचे हाल निर्माण झाले. अनेकांचा रोजगार बंद पडला. दररोजच्या मजुरीवर ज्यांची उपजीविका चालायची अशा अनेक कुटुंबांचे खाण्यापिण्याचे प्रश्न निर्माण झाले. ही सर्व परिस्थिती पाहून श्री. नरसिंह जयंती बुद्ध पौर्णिमा ते रमजान ईद या
कालावधीमध्ये लातूर शहर, आर्वी, पाखरसांगवी, हरंगुळ बु या परिसरातील निराधार विधवा परित्यक्ता व ज्यांची कौटुंबिक स्थिती दुर्बल आहे अशा ४८ कुटुंबांना धान्य व साहित्याची मदत देण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे व्यंकट पनाळे यांनी पुढाकार घेऊन आपले मित्र हाजी बाबा शेख, डॉ. राम गजधने यांना सोबत घेवुन यांच्या सहकार्याने हि मदत एकत्रित करून त्यांच्या मदतीने त्यांनी ही मदत वाटप केली. हाजी बाबा उर्फ ईमाम शेख, अल्ताफ शेख, अश्पाक शेख, बिभिशन भारत जाधव तुळजाई किराणा, संदीप अशोकराव सूर्यवंशी सिद्धि कीराणा, डॉ. विनोद मानकोसकर, डॉ. विनोद स्वामी, डॉ. रामराजे गायकवाड, डॉ. रामलिंग सुरवसे, डॉ. राम गजधने, अत्रेश्वर शितोळे शितोळे मेडिकल, विकास दरकसे वेदिका मेडिकल यांच्या सहकार्याने व मदतीने हे सर्व धान्य साहित्य वाटप करण्यात आले.
-- व्यंकट पनाळे, पत्रकार
९४२२०७२९४८