तळा शहरातील जोगवाडी यथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह.
तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या पोहचली १० वर.
महाराष्ट्र 24 आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर)
तळा तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून तालुक्यासह आता शहरातही कोरोना विषाणूने प्रवेश केला आहे. शहरातील जोगवाडी येथील ५० वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली असून तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या १० वर पोहचली आहे. पैकी ३ रूग्ण बरे झाले असून उर्वरित ७ रूग्णावर उपचार सुरू आहेत. जोगवाडी येथे आढळलेली पाॅझिटीव्ह महिला १८ तारखेला मुलुंड येथून आपल्या गावी जोगवाडी येथे आली होती तिच्या मध्ये कोरोना विषाणूचे लक्षणे आढळल्याने तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते मात्र आज तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला पुढील उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आले.तिच्या समवेत मुलुंड ते जोगवाडी असा प्रवास केलेल्या तीन जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून ही महिला इतर कोणाच्याही संपर्कात आली नसल्याने पुढील धोका टळला आहे.