पुरोगामी विचारमंच व समता संघर्ष आणि संत रविदास प्रबोधन मंडळाचे संयुक्त विद्यमाने कल्याण शहरात जिवनवश्यक वस्तूंचे 100 किट्स वाटप

 


पुरोगामी विचार मंच व समता संघर्ष आणि संत रविदास प्रबोधन मंडळ यांच्या संयुक्त पुढाकाराने दुस-यांदा कल्याण शहरात गरजूंना जिवनावश्यक वस्तूंसह धान्यांच्या 100 शंभर किटचे वाटप


महाराष्ट्र 24 आवाज 


प्रतिनिधी- बंडू घोडे


  कल्याण  :- दि.02/05/ 2020 रोजी कल्याण शहरात काही सामाजिक संघटना व समाज सेवकांनी मा.तहसिलदार साहेब व खडकपाडा पोलिस स्टेशनचे  वरिष्ठ पो.निरिक्षक यांच्या सहमतीने व  नियमानुसार सुरक्षित अंतरासह मोहना,म्हारळ,चिंचपाडा,मिलींद नगर,ईंदिरानगर,धा.शहाड.सिद्धार्थनगर ,शिवकाँलनी,बिर्लाकाँलेज,कोकणवसाहत,चिकनघर,पोर्णिमा,ईत्यादी ठिकाणच्या  सर्व 
गरजूना मदत करण्यासाठी पुढाकार घेवून  मा.बंडू घोडे(सर),मा.शैलैश दोंदे,मा.डाँ बी.एस वाघ,मा.अँड.दिलीप वाळंज,गणेश सोष्टे, यांच्या सह या कामी मा.विश्वकांतजी लोकरे,मा.भरत सगळगिळे,मा.अविनाश मोहिते,मा.रामकिशन तायडे,मा.माणिक एडके,मा.भोसीकर साहेब,दिपश्री बलखंडे- माने मँडम,वाधवा मिडोज तर्फे वैशाली भालेराव,किर्तिश वैरागडे ,दीपा सरकारे,विशाखा पाटील,रुपाली मिसाल,रुपेश बेसेकर यांसारख्या काही समाज सेवक व वर नमुद सामाजिक संघटनांनी  सहकार्य करून विशेष प्रयत्न केल्यामुळे गरजूना जिवनावश्यक वस्तूंसह शंभर (100)धान्यांच्या किटचे आज वाटप करणे शक्य झाले.व आम्हाला समाधान वाटले
 आज लाँकडाउन मुळे सर्वजण घरातच असल्याने तळहातावर पोट असणा-या गरिबांच्या उत्पन्नांचे सर्व मार्ग बंद झाल्याने गरिबांना जिवनावश्यक वस्तू विकत घेउन जगणेच कठिण झालेले आहे.
 कोरोना मुळे सरकारने निर्गमित केलेल्या नियमांचे व शाररिक अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करत राष्टीय लढ्यात कोरोनाच्या संकटा बरोबर लढण्यासाठी लोकांना शक्ती मिळावी म्हणून गरजू व गरिबांना गहु,व गव्हाचे पिठ,तांदुळ,खाद्यतेल,मिठ,साखर,चहापती,दाळी,बटाटा,कांदा पोहा,रवा,हळद,कपड्याची साबुन,अघोळीची साबुन,गरम मसाला पावडर,मिर्ची पावडर,ईत्यादी जिवनावश्यक वस्तूंसह धान्याच्या (100) शंभर किटचे दुस-यांदा पुरोगामी विचार मंच,समता संघर्ष आणि संत रविदास प्रबोधन मंडळा च्या वतिने वाटप केले.
   या कार्यासाठी मा.शैलैश दोंदे,मा.बंडु घोडे(सर),डाँ बी.एस वाघ व अँड दिलीप वाळंज गणेश सोष्टे, कोंडीबा खंडागळे,संतोष सानावले यांनी नियोजन करून विशेष परिश्रम घेतले.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image