पुणे येथुन लातुरात आलेल्या १२ जणांना १२ नंबर पाटीवर पकडले !
महाराष्ट्र 24 आवाज
लातूर : ( व्यंकट पनाळे)
लातुर जिल्ह्यातील उदगीर येथील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच कसल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता आणि प्रवासाची परवानगी न काढता प्रशासनाची दिशाभूल करीत पुणे येथुन मोटारसायकल वर आलेल्या १२ जणांना ५ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास शाम नगर बारा नंबर पाटी येथील अँटी करोना फोर्सच्या जवानानी पकडले. त्यानंतर या बारा जनांना समाज कल्याण विभागांच्या वस्तिगृहात क्वारंटाइन करण्यात आले आहे.
काल मंगळवारी संध्याकाळी सात वाजता पुणे मधुन उंड्री येथुन पाच मोटारसायकल वरुन निघालेल्या १२ मजुरांना लातुरच्या शाम नगर बारा नंबर पाटी, बार्शी रोड येथील अँटी करोना फोर्सच्या तरुणानी त्यांना पकडले. या बारा जनात पाच महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. दहा जण उदगीर तालुक्यातील मुळचे राहिवाशी आहेत,. तर एक कुटुंब कर्नाटक मधील गणेशपुर ता औराद जि बिदर येथील आहे. हे सर्वच एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे सर्वजण मजूरीचे काम करतात. लॉकडाऊन जेव्हापासून लागू झाले आहे, तेव्हापासून काम बंद आहे. त्यामुळे त्यांची उपासमार होत असून आतापर्यंत कोणीच मदत केली नाही, तसेच गावाकडे दोन नातेवाइकांचा मृत्यु झाल्याने आम्ही गावाकडे जात असल्याचे पकडलेल्या लोकांनी सांगितले. शिवाय पुणे येथुन गावाकडे जाण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरला तरी अजुनही प्रशासनाने काहीच केले नाही, त्यामुळे मोटारसायकल वर गावाकडे निघालो असे या मजुरानी सांगितले.
* अॕटी करोणा फोर्स ने दिले भोजन
लातूरच्या शाम नगर बारा नंबर पाटी येथे पुणे येथुन उपासपोटी आलेल्या या बारा जणांना अॕटी करोणा फोर्स च्या जवांनानी शामनगर मधून अन्न एकत्र करून भोजन दिले. अॕटी करोणा फोर्स ने त्यांची चौकशी केली. आणि प्रशासनाशी बोलून त्यांना रुग्णवाहिकेतुन नेवून क्वारंटाइन केले आहे. ही कामगिरी अॕटी करोणा फोर्स चे जवान भागवत कोतवाड, बालाजी माळी, विशाल चव्हाण, प्रदीप शेवाळे, इरशाद शेख, पृथ्वीराज कुरे, संदिपान बडगिरे, नरेंद्र बनसोडे यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले.
-- व्यंकट पनाळे, पत्रकार
९४२२०७२९४८