अमरावती अचलपूर मधील पळसापूर गावात केव्हीड 19 पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू
42 वर्षीय रुग्णाचा नागपूर उपचारा दरम्यान झाला मृत्यू
गावसील करण्याचे प्रक्रिया सुरु
महाराष्ट्र 24 आवाज
जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अमरावती जिल्हातील 42 वर्षीय तरुण कर्करोगाने पिढीत होता ज्यास नागपूर येथे दोन दिवसापूर्वी भर्ती केल्या गेले. ज्याच्या आज तीन वाजता मृत्यू झाला असून त्या मृतकाचा थ्रोड स्लॅब कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समझते. कर्करोगाने पिढीत ह्या इसमावर प्रशासनाचे लक्ष वेधल्या गेले नाही. तो कोरोना पॉझिटिव्ह मृतक कित्येक लोकांना मिळाला असले ज्यासाठी संपूर्ण गाव सील केल्या जात आहे. त्या व्यक्तीचे संपर्कात असणाऱ्यांना कॉरंटाईन करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. ज्यामुळे अचलपूर तालुक्यातील प्रशासनिक व्येवस्था सक्रिय झाली असून त्या पॉझिटिव्ह रुग्णाचे मृत्यू मुळे 15 किलोमीटर असणाऱ्या अंजनगाव सुर्जी पर्येंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवसेन दिवस रुग्णांचे वाढते प्रमाण चिंतेचा इशारा असून सामाजिक विलगीकरणाचे भान ठेवणे, वेळोवेळी हाथ स्वच्छ करणे, तोंडाला माक्स लावणे हे प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे. प्रशासन आपले साठीच निरनिराळ्या प्रतिबंध करीत आहे. मात्र त्यात आपले आरोग्य सुरळीत राखण्याचा खरा प्रयत्न आहे. आपणच आपले रक्षक बना आणि सुरक्षित रहा.