तळा तालुक्यात सापडला पहिला कोरोना पाॅझिटीव्ह , प्रकृती स्थिर
महाराष्ट्र 24 आवाज
प्रतिनिधी- श्रीकांत नांदगावकर
तळा- रायगड : देशभरासह राज्यात गेल्या अडीच महिन्यापासून कोरोनाचे वादळ घोंघावत आहे. दक्षिण रायगडमध्ये श्रीवर्धन, पोलादपूर, महाड, माणगाव नंतर आता तळा तालुक्यात कोरोनाने शिरकाव केलेला आहे. तळा तालुक्यातील तळेगाव येथील 20 वर्षीय तरूणांचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. सविस्तर वृत्त असे की, तळेगाव येथील 20 वर्षीय तरूण मुंबई (धारावी) येथून दि 7 / मे/ 2020 रोजी आई व भावासह तळेगाव येथे रात्री कारने आला होता. ही माहिती समजताच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ अमोल बिरवटकर व त्यांचे सहकारी यांनी सदर तरूणांची तपासणी केली असता त्यास ताप असल्याचे आढळल्याने त्या तरूणांस दि 8/ मे/ 2020 रोजी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. दि 9/मे/2020 रोजी सदर तरूणांचा स्वॅब तपासणीसाठी एम जी एम पनवेल येथे पाठविण्यात आले होते. त्या तरूणांचा आज दि 12/मे/ 2020 रोजी पाॅझिटीव्ह रिपोर्ट आला असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. ज्या कारमध्ये त्या तरूणांची आई, भाऊ व वाहन चालकांनी प्रवास केला होता त्या तिघानांही अलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी एम जी एम पनवेल येथे पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तळा प्रशासनाच्या प्रसंगावधानामुळे तो तरूण कोणाच्याही संपर्कात आला नसल्याने कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. तळेगाव येथे ज्या शाळेत आई व भावाला अलगीकरण करण्यात आले होते तेथे त्यांना जेवण व पाणी सुद्धा वेगळे देण्यात आले आहे तळेगाव येथील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व पोलिस पाटील शाळेत ठेवण्यात आलेल्या सर्व लोकांची व्यवस्थित काळजी घेत आहेत. घरी रहा, सुरक्षित रहा , काळजी घ्या व प्रशासनाला सहकार्य करा.